Pune Metro Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवात १२ दिवसांत ४८.३२ लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास | पुणे मेट्रोला ७.४९ कोटींहून अधिक उत्पन्न

गणेशोत्सवात १२ दिवसांत ४८.३२ लाख प्रवाशांनी केला पुणे मेट्रोने प्रवास

HomeBreaking News

Pune Metro Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवात १२ दिवसांत ४८.३२ लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास | पुणे मेट्रोला ७.४९ कोटींहून अधिक उत्पन्न

Ganesh Kumar Mule Sep 26, 2026 7:20 PM

7 Stations of Pune Metro Gets the IGBC Platinum Rating under MRTS Elevated Stations Category
Pune Metro Line 4 | मेट्रो लाईन – ४ प्रकल्पाच्या मार्गिकेवर वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पांची माहिती द्या | पीएमआरडीए कडून महापालिकेकडे केली मागणी
PCMC – Nigdi Metro | PCMC ते निगडी विस्तारित मेट्रो मार्गाला केंद्र सरकारची मान्यता 

Pune Metro Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवात १२ दिवसांत ४८.३२ लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास | पुणे मेट्रोला ७.४९ कोटींहून अधिक उत्पन्न

 

Pune Metro News – (The Karbhari News Service) – यंदाच्या गणेशोत्सवात प्रवाशांनी आणि भाविकांनी प्रवासासाठी पुणे मेट्रोला अभूतपूर्व पसंती दर्शवली आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून म्हणजेच १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या १२ दिवसांच्या संपूर्ण कालावधीत तब्बल ४८,३२,९१५ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. या १२ दिवसांच्या कालावधीत पुणे मेट्रोला ७,४९,२८,३७७ रुपये इतके महसुली उत्पन्न प्राप्त झाले आहे. (Pune News)

अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी, २५ सप्टेंबर सकाळी ६ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ या २४ तासांत ५,८०,२८० प्रवाशांनी मेट्रो सेवेचा लाभ घेतला असून एकाच दिवसात ८५,६१,८९५ रुपयांचे उत्पन्न मेट्रोला मिळाले आहे.

पुणे मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत (२०२४ ते २०२६) ऐतिहासिक आणि मोठी वाढ झाली आहे. २०२४ च्या गणेशोत्सवात मेट्रोने प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या २०,४५,१०० इतकी होती, जी २०२५ मध्ये वाढून ३७,१७,५७८ वर पोहोचली. तर यंदा २०२६ च्या गणेशोत्सवात हाच आकडा ४८,३२,९१५ प्रवाशांवर पोहोचला आहे.

गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीची तुलना केल्यास, २०२५ च्या तुलनेत यंदा २०२६ मध्ये प्रवासी संख्येत २९.९९% (सुमारे ३०%) ची लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. तसेच, २०२४ च्या तुलनेत २०२६ च्या गणेशोत्सव कालावधीतील एकूण प्रवासी संख्येत तब्बल १३६.३२% ची अवाढव्य वाढ झाली असून पुणे मेट्रोची प्रवासी संख्या गेल्या दोन वर्षांत दुप्पटीहून अधिक झाली आहे

गणेशोत्सव काळातील मार्गिकानिहाय (Line-wise) कामगिरी (१४ ते २५ सप्टेंबर):

* मार्गिका १ (Line-1: पीसीएमसी ते स्वारगेट):
* एकूण प्रवासी संख्या: २५,१५,५१६
* एकूण उत्पन्न: रु. ४,१७,४६,६२६
* मार्गिका २ (Line-2: वनाज ते रामवाडी):
* एकूण प्रवासी संख्या: २३,१७,३९९
* एकूण उत्पन्न: रु. ३,३१,८१,७५१
* जिल्हा न्यायालय (District Court) स्थानक (Interchange):
गणेशोत्सव कालावधीत एकूण १०,३९,४५२ प्रवाशांनी जिल्हा न्यायालय स्थानकावर मार्गिका बदल (Interchange) करून मेट्रोच्या जोडणी व्यवस्थेचा (Connectivity) मोठा फायदा घेतला. (केवळ विसर्जनाच्या २४ तासांत १,२२,५५२ प्रवाशांनी इंटरचेंज सेवेचा वापर केला).

गणेशोत्सवातील टॉप ५ मेट्रो स्थानके-

गणेशोत्सवाच्या संपूर्ण १० दिवसांत सर्वाधिक प्रवासी संख्या आणि महसूल नोंदवणारी प्रमुख ५ स्थानके खालीलप्रमाणे आहेत:
१. महात्मा फुले मंडई:
प्रवासी संख्या: ६,८२,४७३
उत्पन्न: रु. १,०१,८५,२५५
२. पीसीएमसी:
प्रवासी संख्या: ४,७२,६५८
उत्पन्न: रु. ९९,६९,८४९
३. स्वारगेट:
प्रवासी संख्या: ४,३५,४८९
उत्पन्न: रु. ६३,२२,२१३
४. रामवाडी:
प्रवासी संख्या ४,०५,४४७
उत्पन्न: रु. ६५,९५,००८
५. पीएमसी:
प्रवासी संख्या २,६९,४७७
उत्पन्न: रु. ३७,४६,१६१

गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत ७१% प्रवाशांनी डिजिटल तिकिट प्रणालीचा वापर केला, तर २९% प्रवाशांनी कागदी तिकीट खरेदी केले. यामध्ये एकूण ८६% प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने (Online/UPI/Card) पेमेंट केले, तर १४% प्रवाशांनी रोख रक्कमेचा वापर केला.

गणेश विसर्जनाच्या दिवशी तब्बल ११ मेट्रो स्थानकांवर प्रत्येकी २० हजारांहून अधिक प्रवाशांची प्रवास केला. यामध्ये महात्मा फुले मंडई स्थानक ७०,३७५ प्रवासी व रु. ९,४६,२३५ उत्पन्नासह अग्रस्थानी राहिले. त्यापाठोपाठ डेक्कन जिमखाना ६४,९३८ प्रवासी (रु. ७,५४,१२९), स्वारगेट ४८,९०६ प्रवासी (रु. ६,३४,९१२), पीसीएमसी ४३,४९१ प्रवासी (रु. ९,२४,९२४), रामवाडी ३७,८९४ प्रवासी (रु. ६,६८,०७७) आणि पीएमसी स्थानकात ३६,५८८ प्रवाशांची नोंद झाली. तसेच वनाज ३०,६८६, नळ स्टॉप ३०,५१९, गरवारे कॉलेज २६,८३२, छत्रपती संभाजी महाराज उद्यान २३,३५० आणि पुणे रेल्वे स्टेशन स्थानकात २०,१४९ प्रवाशांनी प्रवास केला.

“गणेशोत्सवादरम्यान लाखो भाविकांनी पुणे मेट्रोवर दर्शवलेला विश्वास आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. उत्सव काळात प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन गाड्यांची वारंवारता दर ५ मिनिटांवर आणणे, २४ तास अखंडित सेवा देणे, स्थानकांवर चोख व्यवस्थापन ठेवणे आणि होणारी गर्दी लक्षात घेता स्वारगेट, महात्मा फुले मंडई व डेक्कन जिमखाना या मेट्रो स्थानकांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, यामुळे हा ऐतिहासिक प्रवास सुलभ व सुरक्षित होऊ शकला. पुणेकरांनी आणि बाहेरून आलेल्या भाविकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत डिजिटल तिकीट प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला, त्याबद्दल मी सर्व प्रवाशांचे मनापासून आभार मानतो.”

— श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: