Pune Metro Timetable | गणेशोत्सव २०२६: पुणे मेट्रोचा विशेष प्लॅन जाहीर | अनंत चतुर्दशीला ४१ तास अखंड सेवा

Homeadministrative

Pune Metro Timetable | गणेशोत्सव २०२६: पुणे मेट्रोचा विशेष प्लॅन जाहीर | अनंत चतुर्दशीला ४१ तास अखंड सेवा

Ganesh Kumar Mule Sep 09, 2026 7:23 PM

Mahavikas Aghadi on Pune Metro | महाविकास आघाडी करणार मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन!
Shivaji Nagar to Hinjewadi Metro | शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार |मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
 Pune Metro Phase 2 : PCMC TO NIGDI Extension sanctioned by Centre 

Pune Metro Timetable | गणेशोत्सव २०२६: पुणे मेट्रोचा विशेष प्लॅन जाहीर | अनंत चतुर्दशीला ४१ तास अखंड सेवा

| मंडई स्थानकाबाबत महत्त्वाचं आवाहन

 

Pune Metro News – (The Karbhari News Service) – गणेशोत्सव काळात पुण्यात येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पुणे मेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे. यंदा गणेशोत्सवासाठी मेट्रोच्या फेऱ्या आणि वेळेत मोठी वाढ करण्यात आली असून, गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. पुणे मेट्रोकडून सविस्तर वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी महत्त्वाचे आवाहन जाहीर करण्यात आले आहे. (Pune Ganesh Utsav 2026)

गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मेट्रोचे वेळापत्रक –

१. १४ ते १६ सप्टेंबर २०२६ (गणेश चतुर्थी ते बुधवार):
वेळ – सकाळी ६.०० ते रात्री ११.०० (नियमित सेवा)
गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटांनी मेट्रो

२. १७ ते २४ सप्टेंबर २०२६ (गौरी पूजन व पुढील काळ):
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष वेळापत्रक.
वेळ – सकाळी ६.०० ते मध्यरात्री २.०० वाजेपर्यंत सेवा सुरू राहणार.

३. २५ सप्टेंबर २०२६ (अनंत चतुर्दशी) – मुख्य दिवस:
या दिवशी मेट्रोची ४१ तास अखंड सेवा
असणार आहे.
२५ सप्टेंबर सकाळी ६.०० वाजल्यापासून ते २६ सप्टेंबर रात्री ११.०० वाजेपर्यंत मेट्रो अविरत सुरू राहील.

४. २७ सप्टेंबर २०२६ पासून:
सेवा पुन्हा नियमित वेळेनुसार सकाळी ६ ते रात्री ११ अशी सुरू होईल.

मंडई स्थानकाबाबत विशेष सूचना – उतरू नका, फक्त परतीसाठी वापरा!

मध्यवर्ती पेठांमधील गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मेट्रोने गर्दी नियोजनाचा विशेष प्लॅन केला आहे.

गणपती दर्शनासाठी कुठे उतराल?

– *मार्गिका १ (PCMC ते स्वारगेट) वरून येणाऱ्यांसाठी:* पेठेतील गणपती दर्शनासाठी *कसबा पेठ मेट्रो स्थानकावर* उतरावे.
– *मार्गिका २ (वनाज ते रामवाडी) वरून येणाऱ्यांसाठी:*
– वनाजच्या बाजूने येणाऱ्या भाविकांनी *डेक्कन जिमखाना* स्थानकावर उतरावे.
– रामवाडीच्या बाजूने येणाऱ्या भाविकांनी *PMC (पुणे महानगरपालिका)* स्थानकावर उतरावे.

*महात्मा फुले मंडई स्थानकात उतरून गर्दी करणे टाळा.* हे स्थानक प्रामुख्याने *फक्त परतीच्या प्रवासासाठी* वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडई स्थानक १४ ते २६ सप्टेंबर दरम्यान *Unidirectional (एकदिशात्मक)* पद्धतीने चालेल –
– *प्रवेशासाठी:* लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील द्वार क्रमांक ३ (फक्त आत जाण्यासाठी)
– *बाहेर पडण्यासाठी:* छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील द्वार क्रमांक २

*जिल्हा न्यायालय येथे Interchange टाळा!*

गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्थानकावर येऊन मार्गिका बदलणे टाळावे. त्याऐवजी वर नमूद केलेल्या कसबा पेठ, PMC, छत्रपती संभाजी उद्यान स्थानकांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुणे मेट्रोने सर्व गणेशभक्तांना या नियोजनाचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: