PMC Contract Employees | मनपा कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत प्रशासन सकारात्मक

Homeadministrative

PMC Contract Employees | मनपा कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत प्रशासन सकारात्मक

Ganesh Kumar Mule Sep 04, 2026 7:53 PM

PMC Sanitary Inspector (SI) Promotion | आरोग्य निरीक्षक पदोन्नती : पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन!
PMC Chief Accounts and Finance Department | पुणे मनपाच्या लेखा व वित्त विभागाकडे 80% कर्मचारी वाणिज्य शाखेची पदवी नसलेले! | लेखा विभागाने मागितली 138 नवीन पदे!
SRA | PMC Pune | जुने वाडे झोपडपट्टी सदृश्य असल्याचा दिला जातो अभिप्राय | माजी नगरसेवकांचा आरोप

PMC Contract Employees | मनपा कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत प्रशासन सकारात्मक

बोनसप्रश्नी राष्ट्रीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाची अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांच्यासोबत बैठक

 

Sunil Shinde – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत कार्यरत सुमारे साडेदहा हजार कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत मनपा प्रशासन सकारात्मक असल्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी दिले आहे. (Prajit Nair IAS)

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना यापूर्वी त्यांच्या मासिक वेतनामध्ये बोनसची रक्कम देण्यात येत होती. मात्र Payment of Bonus Act मधील तरतुदीनुसार ज्या कामगारांचे वेतन २१ हजार रुपयांपेक्षा अधिक झाले आहे, त्यांना बोनस देता येणार नाही, असा निर्णय मनपा प्रशासनाने नुकताच घेतला होता.

या निर्णयाच्या विरोधात आज कामगार नेते व नगरसेवक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी कंत्राटी कामगारांच्या वेतनातून बोनसच्या मूळ रकमेची कपात करण्याबाबत देण्यात आलेले आदेश प्रशासनाने मागे घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली. तसेच कंत्राटी कामगारांना यापुढेही बोनस देता येईल का, याबाबत विधी विभागाचा सल्ला घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी राष्ट्रीय सणांच्या सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा दुहेरी पगार तसेच एक अतिरिक्त पगार गेल्या वर्षभरात कोणत्याही कंत्राटदाराने दिलेला नसल्याचा मुद्दाही शिष्टमंडळाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.

या प्रकरणाची प्रशासनामार्फत तपासणी करून लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी शिष्टमंडळाला दिले.

कंत्राटी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रीय मजदूर संघ सातत्याने पाठपुरावा करीत असून, प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: