Pune Mahapour Nivas | महापौर निवासाचे नाव “रामदूत” ठेवण्यास माजी महापौर संघटनेचा विरोध

HomeBreaking News

Pune Mahapour Nivas | महापौर निवासाचे नाव “रामदूत” ठेवण्यास माजी महापौर संघटनेचा विरोध

Ganesh Kumar Mule Aug 10, 2026 8:31 PM

PMC Affordable Housing | PMAY 2.0: पुणेकरांसाठी खुशखबर! |  PMC बांधणार ५०५३ परवडणारी घरे
Transfer of IAS Dr. Kunal Khemnar! | Prithviraj BP is the new Additional Commissioner of Pune Municipal Corporation
Pune Traffic | PMC Pune | आगामी दोन महिने बांधकाम, पथ विभागातील सर्वच अभियंत्यांना रस्त्यांवर तैनात करा | आबा बागुल यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी 

Pune Mahapour Nivas | महापौर निवासाचे नाव “रामदूत” ठेवण्यास माजी महापौर संघटनेचा विरोध

| “महापौर निवास” हेच नाव कायम ठेवावे – संघटनेचे महापौरांना पत्र

 

Ex Mayor Organisation – (The Karbhari News Service) –  घोले रोडवरील महापौर निवासस्थानाचे नाव “रामदूत” असे बदलण्याचा प्रस्ताव नुकत्याच निवडून आलेल्या सदस्यांनी मांडला आहे. या प्रस्तावाला पुणे शहर माजी महापौर संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. “महापौर निवास” हे नाव 2002 पासून प्रचलित असून ते बदलू नये, अशी मागणी संघटनेने महापौरांना दिलेल्या पत्रात केली आहे. (Pune Mayor)

पुणे शहर माजी महापौर संघटनेच्या वतीने अध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे आणि निमंत्रक अंकुश काकडे यांनी याबाबत महापौरांना पत्र दिले आहे.

पत्रात म्हटले आहे की, महापौरांना कामकाजासाठी शहरात निवासस्थान असावे यासाठी घोले रोड येथे महानगरपालिकेने सुंदर असे दुमजली निवासस्थान बांधले आहे. दीप्ती चवधरी या महापौर असताना 2002 साली त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि त्यावेळीच त्याचे नाव “महापौर निवास” ठेवण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत ते याच नावाने ओळखले जाते.

सन 2026 मध्ये स्वीकृत सदस्य म्हणून निवडून आलेल्या सदस्यांनी या बंगल्याचे नाव “रामदूत” असे करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला माजी महापौर संघटनेचा विरोध आहे.

संघटनेने पत्रात म्हटले आहे की, मुंबईसारख्या मोठ्या शहरात देखील महापालिकेने महापौरांसाठी निवासस्थान बांधले आहे. ते देखील “महापौरनिवास” या नावानेच प्रचलित आहे. त्यामुळे पुणे शहराचेही महापौर निवास हे नाव बदलू नये.

“आपण हा प्रस्ताव मंजूर करण्यासंबंधी स्वीकृत सदस्यांना सांगावे,” अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.

—

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0