PMC Drainage Action | लोहियानगरमध्ये बांधकामाचे पाणी थेट ड्रेनेज चेंबरमध्ये! ‘टार्गेट इन्फ्रा डेव्हलपर्स एल.एल.पी’ला २५ हजारांचा दंड

वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली

Homeadministrative

PMC Drainage Action | लोहियानगरमध्ये बांधकामाचे पाणी थेट ड्रेनेज चेंबरमध्ये! ‘टार्गेट इन्फ्रा डेव्हलपर्स एल.एल.पी’ला २५ हजारांचा दंड

Ganesh Kumar Mule Oct 09, 2026 7:23 PM

Prithviraj Sutar | सार आय टी व सायबर टेक या कंपन्यांना काळ्या यादीत टाका  | पृथ्वीराज सुतार यांचा आंदोलनाचा इशारा 
Jalparni in Jambhulwadi Lake | जांभूळवाडी तलावात पिस्तीया जातीची जलपर्णी! | जलपर्णी काढताना महापालिका प्रशासनाला नैसर्गिक अडचणींचा करावा लागतोय सामना
Pune Water Cut | दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊ नये

PMC Drainage Action | लोहियानगरमध्ये बांधकामाचे पाणी थेट ड्रेनेज चेंबरमध्ये! ‘टार्गेट इन्फ्रा डेव्हलपर्स एल.एल.पी’ला २५ हजारांचा दंड

 

PMC Penalty – The Karbhari News Service –  बांधकामाचे सांडपाणी अनधिकृतपणे थेट ड्रेनेज चेंबरमध्ये सोडून परिसरात अस्वच्छता पसरवल्याबद्दल पुणे महानगरपालिकेने लोहियानगर येथील ‘टार्गेट इन्फ्रा डेव्हलपर्स एल.एल.पी’ या बांधकाम व्यावसायिकावर २५,००० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने ९ ऑक्टोबर  रोजी ही धडक कारवाई करत दंडाची रक्कम वसूल केली. (Pune Municipal Corporation – PMC)

 

कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभाग क्र. २२ अंतर्गत, १०६ लोहियानगर येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असल्याची तक्रार समोर आली होती. बांधकामाचे (कन्स्ट्रक्शनचे) पाणी थेट ड्रेनेज चेंबरमध्ये सोडले जात होते आणि त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली होती. याची दखल घेऊन महापालिकेने तातडीने कारवाई केली.

 

वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली आणि दंड वसूल केला. कारवाईच्या वेळी राजगोळकर यांच्यासह आरोग्य निरीक्षक शिवाजी गायकवाड प्रत्यक्ष उपस्थित होते.

ही कारवाई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (इ) प्रजित नायर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारूळे, परिमंडळ क्र. ५ चे उपायुक्त माधव जगताप आणि कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तिमय्या जगले यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पुढेही कडक कारवाईचा इशारा

पुणे शहरात कुठेही अनधिकृतपणे कचरा टाकणे, अस्वच्छता करणे किंवा ड्रेनेज लाईनचा गैरवापर करून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: