Pune PMC News | पन्नास लाख पुणेकर खड्ड्यांनी त्रस्त – अधिकारी खिसा भरण्यात व्यस्त | रस्ते दुरुस्ती टेंडरमध्ये नियमबाह्य कारभाराचा आरोप

Homeadministrative

Pune PMC News | पन्नास लाख पुणेकर खड्ड्यांनी त्रस्त – अधिकारी खिसा भरण्यात व्यस्त | रस्ते दुरुस्ती टेंडरमध्ये नियमबाह्य कारभाराचा आरोप

Ganesh Kumar Mule Aug 10, 2026 8:03 PM

PMC Pune Assistant Health Officer | राजेश दिघे यांना सहायक आरोग्य अधिकारी पदी  पदोन्नती
Pradhanmantri Gramin Awas Yojana  | प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार- केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान
V Radha IAS  | पुणे महापालिकेच्या “या” कामाबाबत राज्याच्या अतिरिक्त सचिवानी केले कौतुक!

Pune PMC News | पन्नास लाख पुणेकर खड्ड्यांनी त्रस्त – अधिकारी खिसा भरण्यात व्यस्त | रस्ते दुरुस्ती टेंडरमध्ये नियमबाह्य कारभाराचा आरोप

| उज्ज्वल केसकर यांची आयुक्तांकडे चौकशीची मागणी

 

PMC Road Department – (The Karbhari News Service) – स्मार्ट सिटी म्हणून नाव असलेल्या पुण्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि खड्ड्यांमध्ये हरवलेले रस्ते यामुळे पन्नास लाख पुणेकर त्रस्त आहेत. मात्र दुरुस्तीसाठी निघालेल्या टेंडरमध्येच नियमबाह्य कारभार करून काही विशिष्ट कंत्राटदारांना कामे मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी केला आहे. (Pune Breaking News)

मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेल्या पत्रात केसकर, माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी पथ विभागाच्या रस्ते दुरुस्ती आणि रिइनस्टेटमेंट टेंडरमधील घोटाळा उघड केला आहे.

प्लांट कॅपॅसिटीमध्ये दुटप्पी कारभार
पत्रानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मेकॅनिकल विभागाने एका पत्रात प्लांटची क्षमता 128 TPH नमूद केली आहे. तर दुसऱ्या पत्रात तीच क्षमता 80 ते 120 TPH अशी दाखवली आहे. एखाद्या मशीनची क्षमता एकतर 80 TPH असते किंवा 120 TPH असते. मग 80 ते 120 ही रेंज कुठून आणली, असा सवाल केसकर यांनी उपस्थित केला.

टेंडर अटींमध्ये “Declaration of the contractor” अंतर्गत ठेकेदाराकडून लेखी अंडरटेकिंग घेतले जाते की काम मिळाल्यानंतर अटीप्रमाणे प्लांट उभा करावा लागेल. तसे न केल्यास करार रद्द करून बँक गॅरंटी आणि केलेल्या कामाचे पैसे जप्त करण्याचा अधिकार महापालिकेला आहे. इतके स्पष्ट असताना केवळ प्लांटच्या क्षमतेच्या मुद्द्यावरून तांत्रिकदृष्ट्या ठेकेदाराला बाद करणे हा मोठा फ्रॉड असल्याचे केसकर म्हणाले.

कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी
या संपूर्ण प्रक्रियेत कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणत्या कंत्राटदारांशी संपर्क साधला, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे. या प्रकरणात जे जे सामील आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, असेही त्यांनी म्हटले.

केसकर यांनी आयुक्तांना विनंती केली की या विषयाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे पदभार तातडीने काढून घेऊन त्यांच्या जागी नवीन आणि सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. गरज पडल्यास राज्य सरकारकडे तशी मागणी करावी. या पत्राची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना देखील पाठवण्यात आली आहे.

पत्रात केसकर म्हणतात, पन्नास लाख पुणेकरांना दररोज खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांचे अपघात होत आहेत, हाडे खिळखिळी झाली आहेत. मात्र काही अधिकारी, कंत्राटदार आणि तथाकथित नेते स्वतःचे घर भरण्यात मशगूल आहेत. ही बाब पुणे शहरासाठी अत्यंत संतापजनक आहे. Gen Z चे हे तरुणांचे शहर आहे, इथे पारदर्शक कारभार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आयुक्तांनी रिइनस्टेटमेंटच्या आधीच्या टेंडरला स्थगिती देऊन चांगली भूमिका घेतली होती, त्याबद्दल केसकर यांनी आभारही मानले. मात्र आता नव्याने सुरू असलेल्या टेंडरमध्ये पुन्हा तोच प्रकार होत असल्याने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: