PMC Tree Authority | पुण्याचा हरित वारसा जपण्यासाठी वृक्ष प्राधिकरण सरसावले – पहिली बैठक; संरक्षण आणि संवर्धनावर भर
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील झाडे तोड आणि हरित क्षेत्राच्या ऱ्हासाला आळा घालण्यासाठी स्थापन झालेल्या वृक्ष प्राधिकरणाने आज आपल्या कामाला अधिकृत सुरुवात केली. महापालिका आयुक्त कार्यालयात प्राधिकरणाची पहिली मासिक सभा पार पडली. यावेळी शहरातील वृक्षसंपदेचे संरक्षण, संवर्धन आणि कायदेशीर तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
सभेच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम होते.
यावेळी सह महापालिका आयुक्त तथा सदस्य सचिव अशोक दि. घोरपडे, संबंधित सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी, हॉर्टिकल्चर मिस्त्री आणि वृक्ष प्राधिकरण समितीवर नव्याने नियुक्त झालेले सदस्य रूपाली सचिन पवार, कोमल सारंग नवले, उज्ज्वला सुभाष जंगले, शैलेंद्र जयवंत बनसोडे, स्नेहा नामदेव माळवदे, अंजली विनोद ओरसे आणि विशाल हरी मलके उपस्थित होते.
सभेत वृक्ष प्राधिकरणाच्या कामकाजासंबंधी विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यामध्ये समितीवरील नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती, नवनिर्वाचित सदस्यांना महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 मधील तरतुदींबाबत माहिती देणे आणि अध्यक्षांच्या मान्यतेने आयत्या वेळी मांडण्यात आलेल्या विषयांचा समावेश होता.
पुणे शहराची पर्यावरणीय समृद्धी आणि हरित वारसा जपण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रभावी नियोजन, समन्वय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.
हरित, सुंदर आणि पर्यावरणपूरक पुण्यासाठी वृक्ष प्राधिकरण कटिबद्ध असल्याचे सभेत सांगण्यात आले.

COMMENTS