Pune Water Cut News | पुण्यातील काही भागात उद्या 5 तास पाणीपुरवठा बंद राहणार

Homeadministrative

Pune Water Cut News | पुण्यातील काही भागात उद्या 5 तास पाणीपुरवठा बंद राहणार

Ganesh Kumar Mule Aug 04, 2026 5:37 PM

FDA | PMC Water NOC | पुणे महापालिकेने FDA ला विनंती केली पण FDA ने मात्र खुशाल हात वर केले | काय आहे प्रकरण?
Pune Water Issue | पुणे उत्तर-पूर्व भागातील गढूळ आणि पिवळसर पाणी समस्या दोन दिवसांत सुटणार |  आयुक्त नवल किशोर राम यांची कुरुळी जलशुद्धीकरण केंद्राला भेट
Pune Water Cut | १० ते १३ जानेवारी या काळात या भागातील पाणीपुरवठा राहणार अंशतः बंद अथवा विस्कळीत 

Pune Water Cut News |  पुण्यातील काही भागात उद्या 5 तास पाणीपुरवठा बंद राहणार

 

 

Pune Water Supply – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना दिली आहे. पर्वती येथील 500 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील एस.एन.डी.डी.एम.एल.आर. झोनच्या डिलेव्हरी साईडच्या स्ल्यूस व्हॉल्व्हची तातडीची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार असल्याने बुधवार  5 ऑगस्ट  रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 7 पर्यंत या झोनमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (PMC Water Supply Department)

पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यानुसार दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही गुरुवारी 6 ऑगस्ट  रोजी सकाळी पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य नियोजनपूर्वक वापर करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

कोणत्या भागात राहणार पाणीपुरवठा बंद

1. एस.एन.डी.डी. एम.एल.आर. झोन
या अंतर्गत लॉ कॉलेज रोड, पौड रोड, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसायटी, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बिग बाजार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी.पी. रस्ता काही भाग, मयूर कॉलनी परिसर, मयूर डी.पी. रस्त्याची डावी बाजू, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्यापर्यंतचा भाग, एरंडवणा परिसर, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत, एच.ए. कॉलनी टिळकेर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदिर परिसर, सुनिता सोसायटी, युको बँक कॉलनी, टँकर पॉइंट, डी.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर, करिष्मा सोसायटी ते वारजेवाडी ऑफिस, गिरीजा शंकर, नवसह्याद्री सोसायटी, ताथवडे उद्यान परिसर, निलकमल, युनायटेड वेस्टर्न, अनुरेखा स्थैर्य, मधुचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, सोसायटी परिसर या भागांचा समावेश आहे.

2. चतु:श्रृंगी टाकी परिसर
औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंधगाव परिसर या भागांमध्ये देखील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: