PMC Traffic Wardens |  पुणे मनपाच्या ५०० ट्रॅफिक वॉर्डन पुरविण्याच्या जयशंकर असोसिएटला दिलेल्या कार्यादेशाला तात्पुरती स्थगिती; आयुक्तांचा आदेश 

पुणे महापालिका आयुक्तांचा ५०० ट्रॅफिक वॉर्डनच्या ठेक्याला स्थगिती देण्याचा आदेश

Homeadministrative

PMC Traffic Wardens |  पुणे मनपाच्या ५०० ट्रॅफिक वॉर्डन पुरविण्याच्या जयशंकर असोसिएटला दिलेल्या कार्यादेशाला तात्पुरती स्थगिती; आयुक्तांचा आदेश 

Ganesh Kumar Mule Oct 02, 2026 8:49 AM

shops : hotel : शहरात दुकाने ११ तर हॉटेल १२ वाजेपर्यंत सुरु राहणार 
Boil and filter water | धरणातून येणाऱ्या पाण्यामध्ये गढुळपणा वाढला
Potholes in pune | महापालिकेकडून गेल्या आठवड्याभरात फक्त १०० खड्ड्यांची डागडुजी 

PMC Traffic Wardens |  पुणे मनपाच्या ५०० ट्रॅफिक वॉर्डन पुरविण्याच्या जयशंकर असोसिएटला दिलेल्या कार्यादेशाला तात्पुरती स्थगिती; आयुक्तांचा आदेश

|  प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत निर्णय

 

Pune PMC News –  The Karbhari News Service – पुणे शहरातील सार्वजनिक चौकांमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठेकेदारी पद्धतीने ५०० ट्रॅफिक वॉर्डन पुरविण्याच्या कामाला पुणे महानगरपालिका आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. या कामासाठी मे. जयशंकर असोसिएट या ठेकेदाराला देण्यात आलेला कार्यादेश चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केला आहे.

महापालिका आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या स्थगिती आदेशात पुणे महापालिका हद्दीतील विविध सिग्नल असलेले तसेच नसलेले आणि गर्दीच्या सार्वजनिक चौकांमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठेकेदारी पद्धतीने ५०० ट्रॅफिक वॉर्डन पुरविण्याचे काम मे. जयशंकर असोसिएट या ठेकेदारास देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कार्यादेशानंतर सोशल मीडियावरील चर्चेची प्रशासनाने घेतली दखल

या कामाबाबत आणि ठेका देण्याच्या प्रक्रियेबाबत समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या नकारात्मक बातम्या व चर्चा प्रसिद्ध होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे जनमानसात संभ्रम निर्माण होत असून महापालिकेच्या पारदर्शक कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.प्रशासकीय पारदर्शकता आणि जनहित लक्षात घेऊन समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या बातम्यांची तसेच संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर सत्यता पडताळणी आणि चौकशी करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यादेशाला स्थगिती

आदेशानुसार, या प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होऊन पुढील लेखी आदेश प्राप्त होईपर्यंत मे. जयशंकर असोसिएट यांना १७ सप्टेंबर २०२६ रोजी देण्यात आलेल्या कार्यादेशाला तत्काळ प्रभावाने स्थगिती देण्यात आली आहे.त्यामुळे या कार्यादेशाअंतर्गत पुढील कामकाज सुरू ठेवण्यासही मनाई करण्यात आली आहे.

ठेकेदाराला काम सुरू न करण्याच्या सूचना

महापालिका आयुक्तांच्या आदेशात मे. जयशंकर असोसिएट या ठेकेदाराला पुढील आदेश मिळेपर्यंत या ठेक्याअंतर्गत कोणतेही काम सुरू करू नये अथवा सुरू असलेले काम चालू ठेवू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी गंभीर नोंदही आदेशात करण्यात आली आहे.

सुरक्षा विभागाने १७ सप्टेंबर २०२६ रोजी कार्यादेश जारी केला होता. मात्र, या प्रक्रियेबाबत समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. चौकशीचा निष्कर्ष आणि त्यानंतरचा पुढील लेखी आदेश काय असेल, याकडे आता लक्ष लागले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: