PMC Employee Anant Nimbalkar | गेली 20 वर्षे मुख्य सभेचा झेंडा लावण्याची जबाबदारी निष्ठेने पार पडणारे अनंत निंबाळकर सेवानिवृत्त!

Homeadministrative

PMC Employee Anant Nimbalkar | गेली 20 वर्षे मुख्य सभेचा झेंडा लावण्याची जबाबदारी निष्ठेने पार पडणारे अनंत निंबाळकर सेवानिवृत्त!

Ganesh Kumar Mule Aug 03, 2026 9:12 PM

PMC Employees Transfers | लेखनिकी संवर्गातील 286 कर्मचाऱ्यांच्या होणार नियतकालिक बदल्या 
Second installment | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 8-10 दिवसांत आयोगाच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम रोखीने मिळणार
PMC Pension | पेन्शन प्रकरणाची प्रभारी नगरसचिवांकडून गंभीर दखल| | संबंधित बिल क्लार्कला २४ तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश

PMC Employee Anant Nimbalkar | गेली 20 वर्षे मुख्य सभेचा झेंडा लावण्याची जबाबदारी निष्ठेने पार पडणारे अनंत निंबाळकर सेवानिवृत्त!

| 33 वर्ष पुणे महापालिकेत केली सेवा

 

PMC GB Flag – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सेवेत 33 वर्षे निष्ठेने काम केलेले अनंत नथुराम निंबाळकर जुलै 2026 मध्ये सेवानिवृत्त झाले. निंबाळकर यांनी आपल्या सेवाकाळात विविध विभागांमध्ये काम पाहिले, मात्र गेली 20 वर्षे त्यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेचा झेंडा लावण्याची जबाबदारी सांभाळली. (PMC General Body)

निंबाळकर यांनी सेवेला सुरुवात उद्यान विभागातून रोजंदारी कर्मचारी म्हणून केली. त्यानंतर विद्युत विभाग आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात काही वर्षे काम केले. विद्युत विभागात असताना ते महापालिका सेवेत कायम झाले होते.  2006 पासून ते नगरसचिव कार्यालयात कार्यरत होते.

नगरसचिव कार्यालयातील सेवेदरम्यान त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाची जबाबदारी होती ती म्हणजे मुख्य सभेचा झेंडा लावणे. पुणे महापालिकेची मुख्य सभा ही सर्वोच्च आणि सार्वभौम असल्याने तिच्या सन्मानासाठी सभेच्या दिवशी झेंडा लावण्याची परंपरा आहे. सकाळी ८ वाजता झेंडा लावला जातो आणि सभा संपल्या नंतर तो झेंडा काढला जातो.

 

पुणे महापालिका मुख्य सभा झेंडा

 

निंबाळकर यांनी ही जबाबदारी गेल्या 20 वर्षे तितक्याच निष्ठेने पार पाडली. जुनी इमारत च्या समोर महात्मा फुले यांच्या पुतळ्या पाठीमागे हा झेंडा लावला जातो. सर्वसाधारण सभा असेल त्या दिवशी सकाळी 8 वाजता त्यांनी त्रिकोणी झेंडा महापालिका ध्वजस्तंभावर लावला जातो. सभेच्या दिवशी सभागृहातील मुख्य सभेच्या डायसची जबाबदारीही त्यांच्याकडेच होती.

महापालिकेत  मुख्य सभेच्या सन्मानासाठीचा झेंडा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. ही परंपरा गेल्या 20 वर्षांपासून निंबाळकर यांनी कोणत्याही खंडाशिवाय जपली.

महापालिका प्रशासनानेही निंबाळकर यांच्या प्रदीर्घ आणि निष्ठावंत सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 33 वर्षांच्या सेवेनंतर ते आता सेवानिवृत्त झाले असले तरी मुख्य सभेचा झेंडा आणि सभेचा सन्मान जपणाऱ्या एका निष्ठावंत कर्मचाऱ्याची आठवण महापालिकेत कायम राहील.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: