Pune PMC News | पुणे महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव  | 10वी-12वीत 65% पेक्षा जास्त गुण मिळालेल्यांचा सत्कार होणार

Homeadministrative

Pune PMC News | पुणे महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव  | 10वी-12वीत 65% पेक्षा जास्त गुण मिळालेल्यांचा सत्कार होणार

Ganesh Kumar Mule Jul 28, 2026 8:21 PM

Ration Card Holders | शिधापत्रिकाधारकांना जुलैच्या धान्यासोबत जूनच्या धान्याचे वितरण
Participation of citizens in the budget | बजेट मध्ये नागरिकांचा सहभाग | ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले जाणार | 1 सप्टेंबर पर्यंत नागरिक देऊ शकतात कामे
अक्षय तृतीयेच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्याचे नोंदणी महानिरीक्षक यांचे आदेश

Pune PMC News | पुणे महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव  | 10वी-12वीत 65% पेक्षा जास्त गुण मिळालेल्यांचा सत्कार होणार

| 24 ऑगस्टपर्यंत अर्ज मागवले

 

PMC Labour Welfare Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका अधिकारी व सेवकांच्या पाल्यांनी इयत्ता 10वी व 12वीच्या 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या यशस्वी पाल्यांचा कामगार कल्याण निधीमार्फत गुणगौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी यासंदर्भात कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे.

65% पेक्षा जास्त गुण मिळालेल्यांचा होणार सत्कार
परिपत्रकानुसार, माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजेच इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत 65% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या कामगार कल्याण निधीच्या सभासद सेवकांच्या सर्व पाल्यांचा सत्कार केला जाणार आहे. उतीर्ण झालेल्या सर्व पाल्यांचे कामगार कल्याण निधीतर्फे हार्दिक अभिनंदनही करण्यात आले आहे.

सत्कारासाठी पात्र असणाऱ्या पालकांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडून अर्ज सादर करणे बंधनकारक आहे:
1. गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत
2. मे 2026 चा एप्रिल महिन्याचा पेड इन वेतनबिल
हा अर्ज खातेप्रमुखांमार्फत कामगार कल्याण विभागाकडे सादर करावा लागेल.

इच्छुक पालकांनी 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत. या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत सर्व खातेप्रमुखांनी या कार्यालयीन परिपत्रकाची माहिती त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व संबंधित अधिकारी व सेवकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

हे परिपत्रक अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर आणि मुख्य कामगार अधिकारी तथा कामगार कल्याण निधीचे सचिव नितीन केंजळे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: