Youth Congress Pune | केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन

HomeBreaking News

Youth Congress Pune | केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन

Ganesh Kumar Mule Jul 21, 2026 9:17 PM

Pune News | रस्त्यावरील भाजी विक्रेत्याचे पूरग्रस्तांसाठी ‘लाख’मोलाचे दान!
Shivsena UBT on PMC Election | शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग! | दत्त जयंतीच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात
Muralidhar Mohol on PMC Projects | विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी | केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती | सोळा प्रकल्पांचा घेतला आढावा

Youth Congress Pune | केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन

 

Pune News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले. (Pune Breaking News)

दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करत आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

यावेळी युवक काँग्रेस व महिला युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान “हिटलर की बात करेगा, हिटलर की मौत मरेगा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा निषेध, शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वाची मागणी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे युवक काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.या आंदोलनित युवक कॉंग्रेसप्रदेशाध्यक्ष शिवराजदादा मोरे ,पुणे युवक कॉंग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, उमेश पवार, प्रथमेश आबनावे, प्रियांका चौधरी, ओंकार मोरे, महेश‌ म्हेत्रे, भूषण रानभरे ,अथर्व सोनार ,उमेश खंदारे आकाश‌ भोपळे भूषण पाटोदकर ,सागर धाडवे, अक्षय बहीरट, सद्दाम शेख ,अभिषेक अवचार, करण गिल, निशांत देशमुख, मेघश्याम धर्मावत, कुणाल काळे, स्वप्निल गायकवाड, रोहीत पाटोळे, मंथन सपकाळ, प्रसन्न मोरे, दिलिप देशमुख, ऋषी थोरात, प्राजक्ता कल्याणी आदी प्रदेश युवक आणि पुणे शहर युवक चे पदाधिकारी या आंदोलना सहभागी झाले होते

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0