Sambhaji Garden Parking | छ. संभाजी उद्यानातील बंद पार्किंगचे धोकादायक स्ट्रक्चर अखेर काढणार  | स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव

Homeadministrative

Sambhaji Garden Parking | छ. संभाजी उद्यानातील बंद पार्किंगचे धोकादायक स्ट्रक्चर अखेर काढणार | स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव

Ganesh Kumar Mule Jul 22, 2026 7:32 AM

Pune Pub News | पुण्यातील वाढत्या पब अनाचाराला आवर घाला | महायुती
Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण ८ निर्णय जाणून घ्या
PMC Labour Welfare Department | अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाला २५ लाखांची मदत | विमा योजना अंतर्गत देण्यात आली रक्कम 

Sambhaji Garden Parking | छ. संभाजी उद्यानातील बंद पार्किंगचे धोकादायक स्ट्रक्चर अखेर काढणार

स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव

स्पार्कटेक इंजिनिअरिंगचा 29 हजार प्रती मेट्रिक टन दर

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या सद्गुरु जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर येथील छ. संभाजी उद्यानात उभारण्यात आले मेकॅनिकल पार्किंगचे धोकादायक झालेले स्ट्रक्चर अखेर काढण्यात येणार आहे. देखभाल-दुरुस्ती अभावी बंद असले हे पार्किंग नागरिकांसाठी धोकादायक बनले होते. हे स्ट्रक्चर काढण्याचे काम करण्यासाठी स्पार्कटेक इंजिनिअरिंग या कंपनीच्या 29 हजार रुपये प्रती मेट्रिक टन या सर्वात कमी दराच्या निविदेला स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. (Pune PMC News)

महापालिकेच्या प्रस्तावानुसार संभाजी उद्यान येथील मेकॅनिकल पार्किंग गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती अभावी बंद आहे. सदर पार्किंगचा वापर होत नसल्याने आणि त्याची देखभाल व दुरुस्ती तसेच संचालनासाठी विशेष प्राविण्य असलेला ठेकेदार उपलब्ध होत नसल्याने नियमित देखभाल झालेली नव्हती.

त्यामुळे पार्किंगचे स्ट्रक्चर धोकादायक झाले होते. तसेच ते पुन्हा सुरू करण्यासाठी लागणारा खर्च आणि पार्किंगच्या वापरापासून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने ते आर्थिकदृष्ट्या फायदेशीरही नव्हते. या कारणांमुळे हे स्ट्रक्चर काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिका आयुक्तांनी 21/05/2026 रोजी यास प्रशासकीय मान्यता दिली होती.

या कामासाठी 19/05/2026 रोजी B-2 पद्धतीने निविदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद म्हणून एकूण 7 निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी 4 निविदा तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्या.

प्राप्त 4 पात्र निविदाधारक आणि त्यांनी दिलेले दर पुढीलप्रमाणे आहेत:

1 Sparktech Engineering B-2 29,000/-
2 Aditya Enterprises B-2 30,000/-
3 Saileela Construction B-2 34,000/-
4 A.R. Construction B-2 2,00,000/-

वरील 4 निविदांपैकी सर्वात कमी दर म्हणजेच 29,000/- रुपये प्रती मेट्रिक टन जीएसटी सह हा दर हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, हडपसर येथील मे. स्पार्कटेक इंजिनिअरिंग यांनी दिला आहे. अक्षरी रक्कम एकोणतीस हजार रुपये फक्त.

त्यामुळे या कामाचा करारनामा स्पार्कटेक इंजिनिअरिंग यांच्याशी करून काम करून घेण्यासाठी स्थायी समितीच्या मान्यतेची विनंती करण्यात आली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: