23 Villages Draft DP | २३ गावांच्या विकास आराखड्यासाठी पुणे मनपात स्वतंत्र कक्ष

Homeadministrative

23 Villages Draft DP | २३ गावांच्या विकास आराखड्यासाठी पुणे मनपात स्वतंत्र कक्ष

Ganesh Kumar Mule Jul 04, 2026 3:57 PM

Prajit Nair IAS | पालखी सोहळ्यासाठी महापालिका सज्ज | अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या आदेशानुसार सर्वंकष नियोजन
Pune Rain Forecast | जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता! | एल निनोच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांची हवामान खात्यास भेट 
PMC JE Exam Results | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा निकाल आचारसंहितेमुळे रखडला | मनपाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितले मार्गदर्शन

23 Villages Draft DP | २३ गावांच्या विकास आराखड्यासाठी पुणे मनपात स्वतंत्र कक्ष

| विकास आराखडा कक्षासाठी २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये सन २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे मनपाने स्वतंत्र “विकास आराखडा कक्ष” स्थापन केला आहे. या कक्षासाठी २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, कार्यकारी अभियंता दिनेशकुमार गिरोल्ला यांच्याकडे कक्षाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. (PMC 23 Merged Villages)

अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) प्रजित नायर यांनी याबतचा कार्यालयीन आदेश जारी केला आहे.

पुणे मनपाच्या हद्दीत सन २०२१ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांसाठी विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. विकास आराखडा कक्षाच्या कामकाजासाठी विविध खात्यांतील २६ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

त्यामध्ये खालील पदांचा समावेश आहे:

कार्यकारी अभियंता (स्था) – १
दिनेशकुमार गिरोल्ला यांच्याकडे कक्षाचे प्रमुख म्हणून अतिरिक्त पदभार.

उप अभियंता (स्था) – ५ जण
पाणीपुरवठा, बांधकाम, भवन रचना, विद्युत विभागातील अभियंते.

शाखा अभियंता (स्था) – ५ जण

शाखा अभियंता – १ जण

कनिष्ठ अभियंता : १

आरेखक/ वास्तू आरेखक (Architect) – ६ जण
मागासवर्ग, भवन रचना, वाणिज्य विभागातील वास्तू आरेखक.

लिपिक/टंकलेखक – ३ जण

बिगारी – २ जण

शिपाई – २ जण

एकूण २६ अधिकारी/कर्मचारी या कक्षात पूर्णवेळ काम पाहणार आहेत.

आदेशानुसार सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन आदेशाच्या दिनांकापासून पुढील आदेश होईपर्यंत विकास आराखडा कक्षाचा पदभार सांभाळायचा आहे. पदभार स्वीकारल्याचा अहवाल आस्थापना विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन हे त्यांच्या मूळ खात्यातूनच अदा करण्यात येणार आहे.

सन २०२१ मध्ये पुणे मनपात समाविष्ट झालेल्या २३ गावांचा पायाभूत सुविधांसह सर्वांगीण विकास करण्यासाठी हा आराखडा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्याने आराखडा तयार करण्याच्या कामाला गती मिळणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: