PMPML News | पीएमपीएमएलकडे १५५१९ पैकी ८०५१ पदे रिक्त!

Homeadministrative

PMPML News | पीएमपीएमएलकडे १५५१९ पैकी ८०५१ पदे रिक्त!

Ganesh Kumar Mule Jun 20, 2026 8:14 AM

PMC Employees | लेखनिकी संवर्गातील ८६ कर्मचाऱ्यांना उप अधिक्षक पदावर पदोन्नती!
Old Pension Scheme | Maharashtra Cabinet Decision | राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | नोव्हेंबर २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय
Pune Congress on Pune Rain | सत्ताधारी व प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे पुणेकरांचे हाल  | मान्सूनपूर्व कामांबाबत सर्वपक्षीय बैठक प्रशासनासमवेत आयोजित करावी |  कॉंग्रेस पक्षाची मागणी

PMPML News | पीएमपीएमएलकडे १५५१९ पैकी ८०५१ पदे रिक्त

| १९५४ बसमधील १८०० रस्त्यावर

Pune PMP Employees – (The Karbhari News Service) – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थात पीएमपीएमएलकडे सध्या ८०५१ पदे रिक्त आहेत, अशी माहिती महामंडळाने पुणे महापालिकेला दिलेल्या लेखी उत्तरात समोर आली आहे. महापालिका सदस्य रवींद्र साळेगावकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती देण्यात आली. १५ जून  रोजी प्रशासन अधिकारी कार्यालयाकडून पाठवण्यात आलेल्या पत्रानुसार पीएमपीएमएलच्या कर्मचारी आणि बस संख्येचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. (Pune PMC News)

बस संख्येपेक्षा कमी बसेस रस्त्यावर
पत्रानुसार पीएमपीएमएलकडे एकूण १९५४ बसेस आहेत. यात ६५८ स्वमालकीच्या, ७६१ भाडेतत्त्वावरील सीएनजी आणि ५३५ भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. मात्र यापैकी प्रत्यक्ष संचलनात सध्या फक्त १८०० बसेस आहेत. उर्वरित बसेस दुरुस्ती, देखभाल किंवा इतर कारणांमुळे रस्त्यावर नाहीत.

८०५१ पदे रिक्त

मे २०२५ च्या कर्मचारी तक्त्यानुसार पीएमपीएमएलमध्ये एकूण १५५१९  पदे मंजूर आहेत. त्यापैकी ७४६८ पदे भरलेली असून ८०५१ पदे रिक्त आहेत.
विभागनिहाय स्थिती अशी:
अॅडमिन विभाग: १७९५ पैकी ११३५ रिक्त, ६६० भरलेली  वर्कशॉप विभाग: २९०२ पैकी २१३३ रिक्त, ७६९ भरलेली  वाहतूक विभाग: १०८२२ पैकी ४७८३ रिक्त, ६०३९ भरलेली
वाहतूक विभागात ड्रायव्हरच्या ३३७८ पैकी ९१५, कंडक्टरच्या ५१९६ पैकी १८७८ आणि इतर २२७५ पैकी १९९० पदे रिक्त आहेत.

वर्षात ३९ हजार तक्रारी
१ जून २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीत नागरिकांकडून पीएमपीएमएलकडे ३९,४१६ तक्रारी प्राप्त झाल्या. महामंडळाने सर्व तक्रारींचे निराकरण केल्याचे पत्रात म्हटले आहे.

इलेक्ट्रिक बस खरेदीचा आराखडा

सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात ५३५ इलेक्ट्रिक बसेस आहेत. पीएम ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत १००० इलेक्ट्रिक बसेस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. यात ९ मीटर नॉन एसी २०० नग, १२ मीटर बीआरटी नॉन एसी ८०० नग ई-बसेसचा समावेश आहे.
ही निविदा प्रक्रिया कन्व्हर्जन एनर्जी सर्व्हिसेस लि. मार्फत राबवली जात असून डिसेंबर २०२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने बसेस ताफ्यात दाखल होतील.
प्रवाशांना दर्जेदार, सुरक्षित सेवा देण्यासाठी आयटीएमएस प्रणालीद्वारे बस संचलनाचे सनियंत्रण, आधुनिक बस थांबे उभारणी आणि लवकरच १७०० नवीन सीएनजी बसेस दाखल करण्याचे नियोजन सुरू असल्याचेही महामंडळाने कळवले आहे.

—-

दिवाळी होऊन ७ महिने गेल्यानंतर पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना मिळाले २५ हजारांचे बक्षीस

दिवाळी सण होऊन ७ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपयांचा दिवाळी बक्षीस मिळाला आहे.
महापालिका सदस्य नितीन गावडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पीएमपीएमएलने १५ जून २०२६ रोजी दिलेल्या लेखी माहितीत ही बाब समोर आली आहे.
महामंडळाच्या म्हणण्यानुसार, निधी उपलब्धतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये दिवाळी बक्षीस ३ जून  रोजी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांचा हक्काचा बक्षीस इतक्या उशिरा अदा केल्याने यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: