Pune PMC News | जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत केलेल्या खर्चात तफावत असल्याचा आरोप   | माजी नगरसेवकांचे आयुक्तांना पत्र 

Homeadministrative

Pune PMC News | जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत केलेल्या खर्चात तफावत असल्याचा आरोप | माजी नगरसेवकांचे आयुक्तांना पत्र 

Ganesh Kumar Mule Jun 19, 2026 8:41 PM

Rents of Mandi | मंडईतील गाळ्यांच्या भाडेवाढी विरोधात सर्व राजकीय पक्ष एकवटले | भाडेवाढ कायद्याच्या कसोटीवर अमान्य असल्याचा दावा 
Sunil Shinde | माथाडी कायदा बदलायला निघालेल्या महायुतीला धडा शिकवा : कामगार नेते सुनील शिंदे
Municipal Election | Ward Structure | प्रभाग रचनेबाबत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची माजी नगरसेवकांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी 

Pune PMC News | जलपर्णी काढण्यासाठी ४ वर्षांत केलेल्या खर्चात तफावत असल्याचा आरोप

| माजी नगरसेवकांचे आयुक्तांना पत्र

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील मुळा-मुठा नदी आणि विविध तलावांमधील जलपर्णी यांत्रिकी पद्धतीने काढण्यासाठी गेल्या ४ वर्षांत १६.६१ कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केला आहे.  महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सभागृहातील लेखी प्रश्नाला उत्तर देताना प्रशासनाने हा खर्च ७ कोटी ९७ लाख रुपये असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात खर्चाचा आकडा १६.६१ कोटी रुपये असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (PMC Pune)

पत्रात दिलेल्या माहितीनुसार:

पाषाण तलाव: ३.२७ कोटी + चालू वर्षी १ कोटी

मुळा-मुठा नदी: ५.२० कोटी + चालू वर्षी १.५० कोटी

कात्रज तलाव: २.५९ कोटी + चालू वर्षी १ कोटी

जांभूळवाडी तलाव: १.२५ कोटी + चालू वर्षी ८० लाख

रामनदी: चालू वर्षी ५० लाख

माजी नगरसेवकांचा आरोप आहे की, मुळा-मुठा नदीत जलपर्णीचे प्रमाण अजूनही प्रचंड आहे. वारजे पुलावरून खडकवासल्याच्या दिशेने पाहिल्यास नदी पूर्णपणे जलपर्णीने भरलेली दिसते.

“८ दिवस काम करून १.५ कोटींचे बिल काढले जाते. ८० टक्के जलपर्णी मांजरीच्या पुढे ढकलून दिली जाते किंवा पुरात वाहून जाते. नंतर त्याचीच बिले काढली जातात,” असे पत्रात म्हटले आहे.

पुराच्या वेळी जलपर्णी वाहून जाईल किंवा भिडे पुलाजवळ अडकल्यावर ती काढली जाईल, अशी वाट पाहिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नवीन तंत्रज्ञानानुसार नेमके किती काम झाले आहे याचा आढावा घेऊनच ठेकेदारांना बिले अदा करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
“गेली अनेक वर्षे एकच कंत्राटदार या कामात आहे आणि तो एका नेत्याच्या अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे अधिकारी आमचे हात बांधले आहेत असे सांगतात,” असेही पत्रात नमूद आहे.

या प्रकरणी तातडीने लक्ष घालून चौकशी करण्याची विनंती आयुक्तांना करण्यात आली आहे. पत्राच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना पाठवण्यात आल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: