Pune Rain Forecast | जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता! | एल निनोच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांची हवामान खात्यास भेट 

Homeadministrative

Pune Rain Forecast | जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता! | एल निनोच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांची हवामान खात्यास भेट 

Ganesh Kumar Mule Jun 19, 2026 8:12 AM

Ajit Pawar | Chandrakant Patil | मंत्री तथा आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन
Municipality for Fursungi-Uruli Devachi | फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
PMC Contract Employees | ४५ वर्षावरील कंत्राटी कामगारांना दिलासा | कामावरून न काढण्याचे पालकमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

Pune Rain Forecast | जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता! | एल निनोच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांची हवामान खात्यास भेट

 

Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – एल निनोच्या संभाव्य परिणामाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पाणी नियोजन आणि खडकवासला धरण साखळीतील जलसाठ्याची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी भारतीय हवामान विभाग, शिवाजीनगर येथे भेट दिली. (Pune Water Supply)

हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांसोबत झालेल्या बैठकीत जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतील पर्जन्यमानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पुणे शहर आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये अपेक्षित पाऊस, त्याचे संभाव्य परिणाम आणि हवामान खात्याच्या अंदाज प्रणालींच्या आधारे उपलब्ध माहितीवर चर्चा झाली.

हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी हंगामी हवामान अंदाज, पावसाचे स्वरूप आणि एल निनो व ला निना या जागतिक हवामान घटनांचा महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे परिसरातील पावसावर होणाऱ्या परिणामाबत माहिती दिली.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. धरण परिसरातही समाधानकारक पाऊस होऊ शकतो, असे संकेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले.

महापालिका आयुक्तांनी सांगितले की, पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले असून नागरिकांना पाण्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि महापालिकेच्या नियमांनुसारच वापर करावा.

नियमबाह्य वापर आणि पाण्याचा अपव्यय केल्यास दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

एल निनो परिस्थितीचा संभाव्य प्रभाव लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून व जबाबदारीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीसाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे. पाणी वाचविणे ही काळाची गरज आहे,” असे आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केले.

या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त प्राजित नायर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी गणेश सोनुने यांच्यासह हवामान विभागाचे साई कृष्णन, डॉ. श्रीजित ओ. पी., डॉ. सत्यबान बिशोई रत्ना, डॉ. सुदीप कुमार, ए. डी. ताठे आणि उदय शेंडे उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: