SIR Pune | मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी पुणे महापालिकेने नेमले नोडल अधिकारी

Homeadministrative

SIR Pune | मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी पुणे महापालिकेने नेमले नोडल अधिकारी

Ganesh Kumar Mule Jun 19, 2026 8:00 PM

Mrs Maharashtra 2024 | महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक यांना “मिसेस महाराष्ट्र २०२४” चा मुकुट! | मिळाले एकूण तीन पुरस्कार
PMC Health Department | सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजात बदल! | शहरी गरीब, CHS चे कामकाज डॉ वावरे यांच्याकडे, PCPNDT, एमटीपी डॉ बळिवंत यांना तर डॉ जाधव यांच्याकडील NUHM डॉ नाईक यांच्याकडे
PMC CHS Health Scheme | अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या औषध बिलांबाबत आरोग्य विभागाकडून नवीन नियमावली

SIR Pune | मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी पुणे महापालिकेने नेमले नोडल अधिकारी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षण मोहीमेसाठी पुणे महानगरपालिकेने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. भारत निवडणूक आयोग  यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात लवकरच एसआयआर राबविली जाणार आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) प्राजित नायर यांनी १९ जून रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या १३ जून २०२६ च्या पत्रानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. (Prajit Nair IAS)

कोण आहेत नोडल अधिकारी?

आदेशानुसार, एसआयआर कामासाठी खालील दोन अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे:

मनीषा नाइक – जन्म-मृत्यू विभाग, पद: महायक आरोग्य अधिकारी
सुनंदा वाखारे – शिक्षण विभाग, पद: प्रशासकीय अधिकारी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ज्या मतदारांचे स्थलांतर होणार नाही अशा मतदारांच्या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात सुनावणी होणार आहे. त्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांनी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करून माहिती पाठवावी, असे निर्देश होते.
आता नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे पदाचे कामकाज सांभाळून पुढील आदेशांपर्यंत एसआयआरचे कामकाज करावयाचे आहे.
महापालिका प्रशासनाने सांगितले की, मतदार याद्या अद्ययावत आणि त्रुटीरहित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असून संबंधित विभागांनी सहकार्य करावे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: