PMC Standing Committee | जंगली महाराज रस्त्यावर BOT तत्त्वावर नवे मल्टी लेव्हल पार्किंग उभारणार | स्थायी समितीची मान्यता

HomeBreaking News

PMC Standing Committee | जंगली महाराज रस्त्यावर BOT तत्त्वावर नवे मल्टी लेव्हल पार्किंग उभारणार | स्थायी समितीची मान्यता

Ganesh Kumar Mule Jun 17, 2026 7:52 AM

Pune Drug News | अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश
Pune Heritage Yatra | पुण्यात ‘हेरिटेज यात्रा २०२६’चा दिमाखदार प्रारंभ |  ७ फेब्रुवारीपर्यंत  उपक्रम सुरू राहणार
Maharashtra Vidhansabha Election | २३ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रात परिवर्तन दिवस !- मोहन जोशी

PMC Standing Committee | जंगली महाराज रस्त्यावर BOT तत्त्वावर नवे मल्टी लेव्हल पार्किंग उभारणार | स्थायी समितीची मान्यता

 

Amol Balwadkar – (The Karbhari News Service)  –  पुणे शहरात वाढत्या वाहनांमुळे निर्माण झालेल्या कार पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज उद्यान, जंगली महाराज रस्ता येथील जुने आणि वापरासाठी अयोग्य झालेले मल्टी लेव्हल पार्किंग पाडून त्याजागी नवे आधुनिक मल्टी लेव्हल कार पार्किंग उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. (Pune PMC News)

प्रकल्प PPP ऐवजी BOT म्हणजेच Build-Operate-Transfer तत्त्वावर राबवण्यास समितीने हिरवा कंदील दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी हा प्रस्ताव मांडला होता. शहरातील विविध ठिकाणी आधुनिक मल्टी लेव्हल कार पार्किंग स्थळांची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने या जागेवर नव्याने पार्किंग उभारण्याचे नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली होती.

प्रस्तावानुसार, सदर जागेवर पुन्हा नव्याने आधुनिक मल्टी लेव्हल कार पार्किंग स्थळ उभारणे ही काळाची गरज आहे. सुरुवातीला हा प्रकल्प PPP म्हणजेच सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबवण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र स्थायी समितीच्या चर्चेनंतर BOT तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

BOT मॉडेलमध्ये खासगी कंपनी प्रकल्पाची उभारणी करून ठराविक कालावधीसाठी त्याचे संचालन करेल आणि त्यानंतर प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करेल.

याशिवाय मंडई, नारायण पेठ आणि संभाजी उद्यान परिसरातही पार्किंग सुविधा वाढविण्याचा विचार सुरू आहे. या प्रकल्पांसाठी बीओटी तत्त्वाचा अवलंब करण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे महापालिकेला थेट आर्थिक खर्च करावा लागणार नाही. खासगी सहभागातून पार्किंग सुविधा उभारून त्याचे संचालन ठरावीक कालावधीसाठी संबंधित संस्थेकडे देण्याचा पर्याय प्रशासन विचाराधीन आहे.

शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून वाहनचालकांना पार्किंगसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर पार्किंग क्षमतेत वाढ करण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात येत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: