Dr Siddharth Dhende | वडगाव शेरीतील दूषित पाणीप्रश्नी आंदोलनाला यश | नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा होईपर्यंत भामा-आसखेडमधील पाणी कपात स्थगित

Homeadministrative

Dr Siddharth Dhende | वडगाव शेरीतील दूषित पाणीप्रश्नी आंदोलनाला यश | नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा होईपर्यंत भामा-आसखेडमधील पाणी कपात स्थगित

Ganesh Kumar Mule Jun 09, 2026 7:49 PM

Vijaystambh | विजयस्तंभ शौर्यदिन नियोजन व समन्वयासाठी सरपंच व समिती सदस्यांची संयुक्त बैठक
Siddharth Nagar | PMC| सिद्धार्थ नगर मधील रहिवाशाना मिळणार पक्की घरे
Jagdish Mulik | नगर रस्त्यावर खराडी, विश्रांतवाडी येथे उड्डाणपुल उभारणार

Dr Siddharth Dhende | वडगाव शेरीतील दूषित पाणीप्रश्नी आंदोलनाला यश | नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा होईपर्यंत भामा-आसखेडमधील पाणी कपात स्थगित

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची माहिती

 

Pune Water Issue – (The Karbhari News Service) – वडगाव शेरी मतदारसंघ तसेच प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या दूषित व अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाची दखल घेत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी आज नागपूरचाळ, मुंजाबा वस्ती आणि भामा-आसखेड जलप्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत भामा-आसखेड प्रकल्प क्षेत्रातील पाणी कपातीचा निर्णय स्थगित करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली. (Pune Breaking News)

या पाहणी दौऱ्यात पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप, भामा-आसखेड प्रकल्पाचे व्यवस्थापक रामदास तारू, सपकाळ, विजय केळकर, एकनाथ गाडेकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि जलशुद्धीकरण केंद्रावरील संबंधित अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी प्रकल्पाची सविस्तर पाहणी करून अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पाणीपुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणी, जलप्रकल्पाची सद्यस्थिती तसेच नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाबाबत प्रशासनासमोर ठाम भूमिका मांडण्यात आली असून तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. वडगाव शेरी मतदारसंघ आणि प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्यासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले, असे डॉ. धेंडे यांनी सांगितले.

यावेळी नगरसेविका शीतल सावंत, नगरसेविका नंदिनी धेंडे, नगरसेवक सुहास टिंगरे, नगरसेवक रवी टिंगरे तसेच प्रभाग १, ३ आणि ४ मधील नगरसेवक व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची टीम उपस्थित होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: