Pune Congress on Trenching | पावसाळ्यापूर्वी खोदाई, नाले साफसफाईची कामे पूर्ण करा | काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Homeadministrative

Pune Congress on Trenching | पावसाळ्यापूर्वी खोदाई, नाले साफसफाईची कामे पूर्ण करा | काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Ganesh Kumar Mule Jun 08, 2026 8:47 PM

Maharashtra Swarajya Party | मनीष आनंद आणि विजय डाकले यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा पाठींबा
Pink E-Rickshaw | मेट्रो स्थानके, विमानतळ तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला फीडर सेवेचा दर्जा देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार
PMC Recruitment Rules | सेवा प्रवेश नियम मुख्य सभेसमोर आणत नसल्याने नगरसेवकांचा प्रशासनाला घेराव

Pune Congress on Trenching | पावसाळ्यापूर्वी खोदाई, नाले साफसफाईची कामे पूर्ण करा | काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

 

Pune News – (The Kabhari News Service) – पुणे शहरात MNGL, मोबाईल कंपन्या, महावितरण, महाप्रीत, आपत्ती व्यवस्थापन आणि २४x७ पाणी पुरवठा विभागाच्या खोदाईच्या कामांमुळे रस्ते आणि फुटपाथची दुरवस्था झाली आहे. एप्रिल २०२६ अखेर ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना जून अखेरपर्यंतही ती सुरू असल्याचा आरोप काँग्रेस ने केला आहे. (Pune Breaking News)

ऋषिकेश (आबा) बालगुडे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पावसाळ्यापूर्वी रस्ते, फुटपाथ दुरुस्ती आणि नाले साफसफाईची कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पुणे ग्रँड सायकल स्पर्धेच्या वेळी नव्याने केलेले रस्ते-फुटपाथही खोदण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२ मार्च  रोजीही याबत लेखी पत्र देऊनही महापालिकेच्या पथ, पाणी पुरवठा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने खासगी कंपन्यांना पाठीशी घालून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी केली, असा आरोप पत्रात आहे.

शहरातील नाल्यांची साफसफाई न झाल्यास दरवर्षीप्रमाणे पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरून नुकसान होण्याची शक्यता आहे. आजही नाले आणि परिसरातील राडारोडा तसाच असल्याचे विविध माध्यमांतून समोर येत आहे.

पावसाळ्यात नाले तुंबून नुकसान झाल्यास त्यासाठी महापालिका अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांना जबाबदार धरून कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बालगुडे यांनी दिला आहे. महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: