MP Supriya Sule | महाविकास आघाडी म्हणून महापालिकेमध्ये विरोधकाची भूमिका  योग्य रितीने राबविणार | खासदार सुप्रिया सुळे

HomeBreaking News

MP Supriya Sule | महाविकास आघाडी म्हणून महापालिकेमध्ये विरोधकाची भूमिका  योग्य रितीने राबविणार | खासदार सुप्रिया सुळे

Ganesh Kumar Mule Jun 02, 2026 8:21 PM

Pune Mahavikas Aghadi | महानगरपालिका निवडणुकीसाठी महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचा वापर थांबवावा : महाविकास आघाडीची मागणी
Mahavikas Aghadi on EVM | महाविकास आघाडीचा आक्रमक | पवित्रा लोकशाहीच्या हत्येचा तीव्र निषेध
NCP – SCP on PMC Election | महाविकास आघाडी म्हणूनच लढणार | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ठाम भूमिका

MP Supriya Sule | महाविकास आघाडी म्हणून महापालिकेमध्ये विरोधकाची भूमिका  योग्य रितीने राबविणार | खासदार सुप्रिया सुळे

 

Mahavikas Aghadi Pune – (The Karbhari News Service) – पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी, काँग्रेस पक्षाचे पुणे मनपाचे गटनेते चंदूशेठ कदम, राष्ट्रवादीचे गटनेते काका चव्‍हाण व दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांसमवेत काँग्रेस भवन येथे बैठक संपन्न झाली. (Pune News)

महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज पुणे येथील ऐतिहासिक काँग्रेस भवनला भेट दिली. या प्रसंगी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी महापौर जिल्हा पुणे पश्चिम विभागाच्या नवनियुक्त शहराध्यक्षा दीप्तीताई चवधरी, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे आणि चंदूशेठ कदम यांनी त्यांचे स्वागत केले.

या सदिच्छा भेटीदरम्यान नेत्यांमध्ये आगामी राजकीय दिशा, महाविकास आघाडीची पुढील रणनीती आणि पुण्याच्या स्थानिक विकासात्मक मुद्द्यांवर सकारात्मक व सविस्तर चर्चा झाली. नगरसेवकांनी या बैठकीमध्ये महत्वाचे प्रश्न मांडले तसेच महाविकास आघाडीची वज्रमूठ अधिक मजबूत करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

यानंतर पत्रकार परिषदेमध्यशे पत्रकारांशी आपले मनोगत व्‍यक्त करीत असताना खा. सुप्रिया सुळे, ‘‘महाविकास आघाडी म्हणून महापालिकेमध्ये विरोधकाची भूमिका अत्यंत योग्य रितीने राबविणार आहोत. पुणेकरांचे प्रश्न आम्ही प्रामुख्याने घेऊन पुण्याच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत.

यानंतर शहराध्यक्ष दिप्ती चवधरी म्हणाल्या की, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संबंध हे केवळ राजकीय नसून कौटुंबिक आणि वैचारिक आहेत. आजची ही भेट आगामी काळातील संघर्षाला आणि महाविकास आघाडीच्या ऐक्याला नवी ऊर्जा देणारी ठरेल. काँग्रेस पक्षाने सातत्याने विकासावर भर दिलेला आहे आणि पुण्यातील अनेक ज्वलंत विषयांवर काँग्रेस पक्ष ठामपणे पुणेकर जनतेच्या हितासाठी आपली भूमिका मांडणार आहे.”

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्तीताई चवधरी, काँग्रेस पक्षाचे पुणे मनपाचे गटनेते चंदूशेठ कदम, राष्ट्रवादीचे गटनेते काका चव्‍हाण यांसह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेवक विशाल तांबे, अनिता इंगळे, अविनाश बागवे, रफिक शेख, साहिल केदारी, विशाल मलके, काशिफ सय्यद, सुनील शिंदे, आसिया मणियार, दिपाली डोख, अश्विनी लांडगे, सायरा शेख, वैशाली भालेराव, तसलिम शेख, आणि महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0