Pune Swimming Pool | शहरातील बंद पडलेले जलतरण तलाव लवकरच सुरू होणार | स्थायी समितीच्या बैठकीत झाली चर्चा 

HomeUncategorized

Pune Swimming Pool | शहरातील बंद पडलेले जलतरण तलाव लवकरच सुरू होणार | स्थायी समितीच्या बैठकीत झाली चर्चा 

Ganesh Kumar Mule May 14, 2026 9:34 PM

Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार
MNGL App | एमएनजीएलने “My MNGL” अ‍ॅप लाँच केले — ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि गॅस सेवा सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune Swimming Tank | शहरातील बंद पडलेले जलतरण तलाव लवकरच सुरू होणार | स्थायी समितीच्या बैठकीत झाली चर्चा

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – निविदा प्रक्रिया वेळेत न राबवल्यामुळे पुणे शहरातील अनेक जलतरण तलाव ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत बंद पडले आहेत. कंत्राट संपलेल्या कंत्राटदारांकडून हे जलतरण तलाव पुणे महानगरपालिकेने ताब्यात आले असून आता बंद अवस्थेत आहेत. महानगरपालिका प्रशासनाने हे जलतरण तलाव सुरू करून उन्हाळ्याच्या सुट्टीत नागरिकांना, लहान मुलांना उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी नगरसेवक प्रशांत जगताप यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. (Prashant Jagtap Pune Congress)

आज स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. उन्हाळ्याची सुट्टी संपायला अवघा एक महिना उरलेला असताना किमान आता तरी हे जलतरण तलाव जनतेसाठी खुले करावेत अशी मागणी नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केली. अशा स्वरूपाचा ठरावही प्रशांत जगताप यांनी मांडला. हा ठराव प्रशासनाकडून स्वीकारण्यात आला असून, पुढील ३-४ दिवसांत जलतरण तलाव पुन्हा सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी आश्वस्त केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: