पुणे शहरास राहण्यास सर्वोत्तम शहर म्हणून पुनःश्च प्रथम क्रमांक प्राप्त होण्यासाठी महापालिका प्रयत्नशील
| मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग अपेक्षित
पुणे | इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स अंतर्गत शहरातील नागरिकांचे राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर बद्दल सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सिटीझन पर्सेप्शन सर्वेक्षण फॉर्म भरावा लागणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या आदेशानुसार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, केंद्र शासन (MoHUA) मार्फत Urban Outcome Framework (UoF) 2022 लाँच केले आहे. शहरातील नागरिकांचे राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर बद्दल सर्वेक्षण सिटीझन पर्सेप्शन सर्व्हे (CPS) हा इज ऑफ लिव्हिंग इंडेक्सचा एक भाग आहे. या सर्वेक्षणामुळे शहरांमधील जीवनमानाच्या गुणवत्तेबद्दल नागरिकांचे मत विचारात घेतले जाणार आहे. ज्यामुळे सेवा वितरण आणि शहरांचे प्रशासन सुधारण्यास मदत होणार आहे. पुणे शहरास यापूर्वी २०१८ मध्ये १ ला आणि २०१९ मध्ये २ रा क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याअनुषंगाने पुणे शहरास राहण्यास सर्वोत्तम शहर म्हणून पुनःश्च प्रथम क्रमांक प्राप्त होण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी सर्वेक्षण फॉर्म भरणे अपेक्षित आहे. असे आदेशात म्हटले आहे.