Pune Metro Ticket | आता तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रोचे AFC गेट्स! | पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय

Homeadministrative

Pune Metro Ticket | आता तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रोचे AFC गेट्स! | पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय

Ganesh Kumar Mule Mar 02, 2026 7:33 PM

Mahavikas Aghadi | Sinet Election | विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणार | अजित पवार
Swachhta Mission | वाघिरे महाविद्यालयाने राबवले स्वच्छता अभियान
Pune News | बिबवेवाडी येथे पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाच्यावतीने धडक कारवाई

Pune Metro Ticket | आता तिकीट स्कॅन केल्यावरच उघडणार मेट्रोचे AFC गेट्स | पुणे मेट्रोचा महत्त्वाचा निर्णय

 

Pune Metro News – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवरील तिकीट तपासणीच्या (AFC) गेटमध्ये मोठा बदल केला आहे. आता मेट्रो स्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना असणारे गेट्स आधीपासून बंद असतील आणि तुम्ही तिकीट स्कॅन केल्यावरच ते उघडतील. हा बदल उद्या मंगळवार,  ०३ मार्च पासून अंमलात आणला जाणार आहे. अशी माहिती मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Metro News)

आतापर्यंत मेट्रोचे एटोमॅटिक फेअर कलेक्शन (AFC) गेट्स नेहमी उघडे असायचे. तिकीट स्कॅन केल्यावर हिरवा दिवा लागायचा आणि प्रवाशांना आत जाता येत असे, पण तिकीट नसताना किंवा चुकीचे तिकीट असल्यास हे फ्लॅप गेट्स बंद होत असत. पण आता पुणे मेट्रोच्या स्थानकांतील हे AFC गेट्स नेहमी बंद राहतील. जेव्हा प्रवासी आपले तिकीट किंवा कार्ड मशीनवर स्कॅन करतील, तेव्हाच हे दरवाजे उघडतील आणि प्रवाशांना आत जाता येईल.

नवीन प्रणाली पुढीलप्रमाणे काम करेल:

* प्रवेशापूर्वी: एएफसी गेटचे फ्लॅप्स (दरवाजे) नेहमी बंद स्थितीत असतील.
* तिकीट स्कॅनिंग: प्रवाशाने क्यूआर कोड तिकीट, मेट्रो कार्ड किंवा व्हॉट्सॲप तिकीट स्कॅन केल्यानंतरच हे दरवाजे उघडतील.
* प्रवेशानंतर: प्रवासी गेटमधून बाहेर पडताच दरवाजे पुन्हा आपोआप बंद होतील.

* विना तिकीट प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास दरवाजे उघडणार नाहीत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: