PMC Standing Committee | मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाचा होणार विस्तार  | मांजरी बुद्रुकपर्यंतच्या कामाला स्थायी समितीचा हिरवा कंदील

Homeadministrative

PMC Standing Committee | मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाचा होणार विस्तार  | मांजरी बुद्रुकपर्यंतच्या कामाला स्थायी समितीचा हिरवा कंदील

Ganesh Kumar Mule May 14, 2026 9:17 PM

IGBC | PMC | हरित विकासासाठी आयजीबीसी प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे ठरले महाराष्ट्रातील पहिले शहर
PMRDA Affordable Housing Lottery| पीएमआरडीएच्या सदन‍िकांची बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत!
PMC Heritage Yatra 2025 | आजपासून “हेरिटेज यात्रा २०२५” सांस्कृतिक वारसा उत्सव | पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन

PMC Standing Committee | मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाचा होणार विस्तार  | मांजरी बुद्रुकपर्यंतच्या कामाला स्थायी समितीचा हिरवा कंदील

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) – मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करणे, पूरस्थितीवर नियंत्रण आणणे आणि नदीकाठाचा विकास साधण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा’चा विस्तार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सध्या सुरू असलेली कामे लक्षात घेता हा प्रकल्प मुंढवा ते मांजरी बुद्रुकपर्यंत वाढविण्याची मागणी भाजपचे नगरसेवक दादा कोद्रे यांनी स्थायी समितीसमोर ठेवला होता, त्याला मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Pune PMC News)

सध्या मुळा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम संगम ते बंडगार्डन (३.७० किमी) आणि बंडगार्डन ते मुंढवा पूल (५.३० किमी) या दोन टप्प्यांत सुरू आहे. या कामांमुळे नदीकाठाचे सुशोभीकरण आणि सांडपाणी व्यवस्थापनात सुधारणा होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, मुंढवा पुलानंतरचा मुंढवा ते मांजरी बुद्रुक हा भाग झपाट्याने विकसित होत असून मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. या भागात नदीपात्रात वाढते प्रदूषण, जलपर्णीची समस्या आणि पावसाळ्यातील पूरधोका लक्षात घेता पुनरुज्जीवनाची गरज असल्याचे सस्पष्ट करण्यात आले आहे.

संगम ते मुंढवा या टप्प्यावर सुरू असलेल्या कामाच्या धर्तीवरच पुढील टप्पा मांजरी बुद्रुकपर्यंत राबविल्यास नदीचे पात्र सलगपणे स्वच्छ ठेवणे शक्य होईल, तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करण्यात आले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: