Pune Breaking News | केंद्र सरकार कडून पुणे महापालिकेला १२९० कोटी निधी मंजूर

Homeadministrative

Pune Breaking News | केंद्र सरकार कडून पुणे महापालिकेला १२९० कोटी निधी मंजूर

Ganesh Kumar Mule May 11, 2026 7:31 PM

Sinhgad Road Flyover | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिहंगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण
Phoenix Social Foundation | अनाथ आश्रमातील मुलांसोबत वाढदिवस साजरा | फिनिक्स सोशल फाउंडेशनचा उपक्रम
PMC Scholarships Schemes | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनेसाठी आता 8 लाखांची उत्पन्नाची मर्यादा! | स्थायी समितीची मान्यता 

Pune Breaking News | केंद्र सरकार कडून पुणे महापालिकेला १२९० कोटी निधी मंजूर

| पाणीपुरवठा आणि पूर नियंत्रण प्रकल्पाला निधी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  “अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत पुणे शहराच्या १२ गावांसाठी पाणीपुरवठा प्रकल्प ८९० कोटी आणि पूरनियंत्रण प्रकल्पांना ४०० कोटी असे एकूण १२९० कोटींची केंद्र शासना मार्फत मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

शहरी विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ (UCF) अंतर्गत पुणे महानगरपालिके च्या पाणीपुरवठा व पूरनियंत्रण या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना ११ मे २०२६ रोजी गृहविकास व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्या सचिवांच्या अध्यक्षते खाली आयोजित पहिल्या  Apex Committee बैठकीत मंजुरी प्राप्त झाली आहे. सदर बैठकीत १२ गावांसाठी ८९० कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पास तसेच पुणे शहरातील पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी ४०० कोटींच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण १२९० कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.

– १२ गावांसाठी पाणीपुरवठा प्रकल्प ८९० कोटी

पुणे महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीतील समान पाणीपुरवठा योजनेचे ८५% काम पूर्ण झाले असून, संपूर्ण प्रकल्प ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यान्वित होण्याचे नियोजन आहे. सध्या ७ गावांमध्ये पाणीपुरवठा कामे प्रगतीपथावर असून २५ गावांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार आहे. तसेच Guillain-Barré syndrome (GBS) प्रभावित खडकवासला, नांदेड, नांदोशी, सनसनगर, किरकीटवाडी, धायरी, नऱ्हे, जांभूळवाडी, कोल्हेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, भिलारवाडी या १२ गावांसाठी ८९० कोटींचा प्रकल्प प्रस्तावित असून २०० MLD जलशुद्धीकरण प्रकल्प, ७१ कि.मी. ट्रान्समिशन मेन लाईन, ३९० कि.मी. वितरण व्यवस्था आणि SCADA/AMR आधारित स्मार्ट मीटरिंग प्रणालीद्वारे २०५२ पर्यंत ७.७८ लाख नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.

– पुणे शहरातील पूरनियंत्रण उपाययोजना ४०० कोटी

पुणे शहरातील ३३५ महत्त्वाच्या पूरग्रस्त ठिकाणी पावसाळी जलनिस्सारण उपाययोजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक उपक्रमांमुळे नागरिक व त्यांची मालमत्ता सुरक्षित राहणेस आणि सार्वजनिक आरोग्यात सुधारणा होणेस मदत होणार आहे. SCADA आधारित स्मार्ट जलव्यवस्थापन व AMR/NRW नियंत्रणामुळे पाणी गळती कमी होऊन २०५२ पर्यंत पुण्यात सक्षम, शाश्वत आणि आधुनिक पाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे पुणे महानगरपालिकेचे लक्ष्य आहे. मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली व सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे पुणे महानगरपालिका शहरातील नागरी सुविधांचे सर्वांगीण संतृप्तीकरण (Saturation) साध्य करण्यासाठी कार्यरत आहे.

मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस हे पुणे शहराकडे विशेष लक्ष देत असून त्यातून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत आहे तसेच शहराची पायाभूत सुविधा अधिक सक्षम होत आहेत. आजचा दिवस पुणे महानगरपालिकेसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे तसेच मा. पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे हे यश शक्य झाले आहे. असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: