PMC City Engineer | विकसकांकडून ताब्यात न आलेले गाळे, सदनिका ताब्यात घ्या   | शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांचे आदेश 

Homeadministrative

PMC City Engineer | विकसकांकडून ताब्यात न आलेले गाळे, सदनिका ताब्यात घ्या  | शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांचे आदेश 

Ganesh Kumar Mule May 11, 2026 7:23 PM

Pune Shivsena | ‘पर्यावरण दिना’निमित्त शिवसेनेकडून भव्य जनजागृती दिंडीचे आयोजन | पुणेकर नागरिकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा संकल्प करावा – प्रमोद नाना भानगिरे
Increasing Voter Turnout | मतदानाचा टक्का वाढविण्याच्यादृष्टीने मतदान केंद्रावरील सुविधांबाबत व्यापक जनजागृती करा | जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
Khasdar Jansampark Seva | खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद | राज्यमंत्री माधुरी मिसाळही अभियानात सहभागी

PMC City Engineer | विकसकांकडून ताब्यात न आलेले गाळे, सदनिका ताब्यात घ्या

| शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांचे आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून पुणे शहरात विविध ठिकाणी विकसकांना त्यांच्या प्रस्तावांना Accommodation Reservation च्या तरतुदी नुसार मंजुरी देण्यात आलेल्या आहेत. आता पर्यंत मंजूर करण्यात आलेल्या ज्या प्रस्तावांना भोगवटा पत्र अदा करण्यात आलेले आहेत, अश्या सर्व प्रस्तावांमधील पुणे महानगरपालिकेला देय असलेले गाळे, सदनिका इ. चे ताबे पुणे महानगरपालिकेला देणे बंधनकारक आहे. मात्र पुणे महानगरपालिकेला काही प्रकल्पामधील गाळे अद्याप ताब्यात आलेले नाहीत अश्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

त्यामुळे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सर्व अभियंत्यांना सूचित केले आहे की, अशा सर्व प्रस्तावांची छाननी करून, कोणत्या प्रकल्पामधील गाळे, सदनिका, इ. मनपाच्या ताब्यात आलेल्या नाहीत याची माहिती कोणत्याही परिस्थितीत १५ मे पूर्वी सादर करावी. तसेच अश्या ताब्यात न आलेल्या जागा त्वरित ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करावी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: