10th Results | सफाई सेविका सुवर्णा पवार प्रतिकूल परिस्थितीवर मात करून झाल्या १० वी पास | प्रशासनाने केला विशेष सन्मान

Homeadministrative

10th Results | सफाई सेविका सुवर्णा पवार प्रतिकूल परिस्थितीवर मात करून झाल्या १० वी पास | प्रशासनाने केला विशेष सन्मान

Ganesh Kumar Mule May 09, 2026 3:49 PM

Maharashtra cabinet Decisions | मंत्रिमंडळ बैठकीतील एकूण 5 निर्णय जाणून घ्या सविस्तर
Pune Pratham Branding | “पुणे प्रथम” च्या माध्यमातून शहराची केली जाणार ब्रॅण्डिंग! | प्रत्येक प्रकल्पात आणि धोरणात ब्रॅण्डिंगचा वापर करणे अनिवार्य
PMC Employees Union | ब्रोकर नेमण्याची टेंडर प्रक्रिया रद्द करण्यासाठी प्रयत्न व्हावेत | पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची पुणे मनपा कामगार युनियन (मान्यताप्राप्त) संघटनेकडे मागणी 

10th Results | सफाई सेविका सुवर्णा पवार प्रतिकूल परिस्थितीवर मात करून झाल्या १० वी पास | प्रशासनाने केला विशेष सन्मान

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – घोले रोड – शिवाजी नगर क्षेत्रिय कार्यालयाच्या कंत्राटी महिला सफाई सेविका सुवर्णा सोमनाथ पवार प्रतिकूल परिस्थितीवर मात करून १० वी पास झाल्या आहेत. याबाबत प्रशासनाने त्यांचा विशेष सन्मान केला. (PMC Sanitation Workers)

प्रभाग क्रमांक १२, रोकडोबा मंदीर आरोग्य कोठीकडे कंत्राटी पद्धतीत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या सुवर्णा पवार माहेरकडील नाव सुवर्णा लक्षमण अवघडे या कंत्राटी सफाई सेविकेने “आता थांबायचं नाय” हा चित्रपट पाहून प्रेरणा घेतली. आणि दहावी पास झाल्या. याबाबत वरिष्ठ आरोग्य निरिक्षक सुनिल कांबळे, पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे जॉईंट सेक्रेटरी वैजीनाथ गायकवाड आरोग्य निरिक्षक राहुल शेळके, श्रीमती संगीता बदामी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, उदय सणस, निखिल निकम, राजेश रासकर, विनोद सरोदे, महेश जाधव, मोकादम राजू गायकवाड व इतर सर्व सेवक उपस्थित होते.

सत्कार समारंभ प्रसंगी श्रीमती सुवर्णा पवार यांनी अशा भावना व्यक्त केल्या की,” सर्व साहेब, मोकादम व सेवक यांच्या पाठिंब्याने व मार्गदर्शनाखाली रात्रपाळीच्या शाळेत प्रवेश घेऊन इयत्ता १० वी च्या बोर्ड परिक्षेत ५५.२०% गुण प्राप्त करून पास झाले ते सर्व श्रेय साहेब व माझ्या सोबत काम करणाऱ्या सेवकांना आहे.

——–

सफाई कामगार असल्याने पुणे महानगरपालिका कामगार युनियन बरोबर संपर्क आला. युनियनने “आता थांबायचं नाय” हा चित्रपट दाखवला म्हणून मला स्वतःला शिकण्याची जिद्द व उमेद निर्माण झाली. म्हणून मला शिक्षण शिकून मला वेगळं काही तरी करायंच आहे. शिवाय माझ्या एकूलत्या एका मुलीस पण शिक्षण शिकवणारच. तसेच इतर कामगारांनी पण शिक्षण शिकावं.

– सुवर्णा पवार, दहावी पास सफाई सेविका.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: