Youth Congress Agitation | नसरापूर प्रकरणी युवक काँग्रेसचे धायरी येथे रास्ता रोको आंदोलन; पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

HomeBreaking News

Youth Congress Agitation | नसरापूर प्रकरणी युवक काँग्रेसचे धायरी येथे रास्ता रोको आंदोलन; पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

Ganesh Kumar Mule May 04, 2026 8:06 PM

PMC Solid Waste Management Department | स्वच्छतेच्या अनुषंगाने नागरिकांचा सहभाग प्रबळ करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थेचा अधिकचा सहभाग अपेक्षित | महापालिका आयुक्त नवल किशोर राम 
Congress Pune | महागाई व GST च्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच काँगेस नेत्यांना मोदी सरकार त्रास देत आहे | अरविंद शिंदे
PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदान जमा 

Youth Congress Agitation | नसरापूर प्रकरणी युवक काँग्रेसचे धायरी येथे रास्ता रोको आंदोलन; पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

 

Nasrapur Incident – (The Karbhari News Service) – नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ पुणे ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे धायरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या घटनेतील पीडितेला तातडीने न्याय मिळावा, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात होऊन अल्पावधीत निकाल लागावा, या प्रमुख मागण्यांसाठी युवक काँग्रेस आक्रमक झाली होती. (Pune Breaking News)

आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर संबंधित प्रकरणात जलदगतीने तपास पूर्ण करून १५ ते २० दिवसांत न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर युवक काँग्रेसने सध्या आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

याबाबत माहिती देताना पुणे ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार यांनी सांगितले की, “पीडित कुटुंबाला न्याय मिळणे हीच आमची प्राथमिकता आहे. पोलिस प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाचा मान राखत आम्ही सध्या आंदोलन स्थगित करत आहोत; मात्र दिलेल्या कालावधीत न्याय मिळाला नाही, तर युवक काँग्रेस अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल.”

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, जिल्हा उपाध्यक्ष सूरज कारदगे, सरचिटणीस भूषण रानबरे, आनंद दुबे, मेघशाम धर्मावत, सुमित शिंदे, प्रदेश सचिव विकास सुपनार, विश्वजीत जाधव, धवलसिंह लावंड, नेहल देशमुख, निखिल मलके, ओंकार मोरे , भूषण पातोदकर ,
यांच्यासह पुणे ग्रामीण युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: