PMC Pension | पेन्शनच्या प्रलंबित प्रकरणांची स्थायी समितीत देखील चर्चा | सदस्यांनी व्यक्त केली नाराजी 

Homeadministrative

PMC Pension | पेन्शनच्या प्रलंबित प्रकरणांची स्थायी समितीत देखील चर्चा | सदस्यांनी व्यक्त केली नाराजी 

Ganesh Kumar Mule May 04, 2026 7:57 PM

Pune Okayama Maitri Garden | पुणे ओकायामा मैत्री उद्यानाची द्वीदशकपूर्ती साजरी  | उद्यान निर्मितीस दोन दशक पूर्ण झाल्याबाबत ओकायामा शिष्टमंडळ जपान  दिली भेट
Pune Property Tax | मिळकतकर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्र सुट्टी दिवशी देखील सुरु राहणार | महापालिका मिळकत कर विभागाची माहिती 
Local Body Election 2025 | नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीकरिता पुणे जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

PMC Pension | पेन्शनच्या प्रलंबित प्रकरणांची स्थायी समितीत देखील चर्चा | सदस्यांनी व्यक्त केली नाराजी

 : सेवानिवृत्त सेवकांची निवृत्तीवेतन प्रकरणे वेळेत पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त सेवकांची निवृत्तीवेतन प्रकरणे सेवानिवृत्तीनंतरही दीर्घकाळ प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत स्थायी समिती बैठकीत देखील चर्चा झाली. समिती सदस्यांनी पेन्शनच्या प्रलंबित प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी अशी पेन्शन प्रकरणे वेळेत मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. (Omprakash Divate PMC)

अतिरिक्त आयुक्तांनी पेन्शन प्रकरणांचा  आढावा घेतला असता प्राथमिक शिक्षण विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय व शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय या विभागांतील सेवकांची निवृत्तीवेतन प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. ही  बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, सेवानिवृत्त सेवकांना त्यांचे हक्काचे आर्थिक लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व खातेप्रमुख यांना अतिरिक्त आयुक्तांनी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार  यापुढील कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांची सेवापुस्तके सेवकाचे सेवानिवृत्तीपूर्वी किमान ६ महिने आगोदर तपासणी करून सेवानिवृत्ती वेतन मान्यते प्रकरणी कोणत्याही अडचणी येणार नाहीत याबाबत पूर्तता करावी. सेवकांची निवृत्तीवेतन प्रकरणे सेवकांना सेवानिवृत्ती विषयक लाभ सेवानिवृत्तीचे दिवशी देता येतील या दृष्टीने किमान १ महिना आधी पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. ज्या प्रकरणांमध्ये विलंब झालेला आहे, ती सर्व प्रकरणे एक महिन्यात प्राधान्याने निकाली काढावीत.

क्षेत्रीय कार्यालयासाठी समिती

१५ क्षेत्रीय कार्यालयांकरिता निवृत्तीवेतन प्रकरणांची विशेष तपासणी करण्यासाठी उप आयुक्त, परिमंडळ क्र. १ ते ५ यांच्या नियंत्रणाखाली प्रशासन अधिकारी, अधिक्षक व उपअधिक्षक यांची समिती स्थापन करण्यात येत आहे.  समितीमधील सदस्यांनी त्यांच्या स्वतःच्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर क्षेत्रीय कार्यालयांना भेट देऊन निवृत्ती वेतन प्रकरणे प्रशासकीय आदेशानुसार मुदतीत पूर्ण होत आहेत का याची तपासणी करावी तसेच सेवानिवृत्तीपूर्व सेवा पुस्तक तपासणी वेळेत केली जात आहे याची खातरजमा करावी. मुख्य इमारतीतील सर्व खाती तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग इत्यादी विभागांसाठी मुख्य कामगार अधिकारी यांनी त्यांचे कार्यालयाकडील अधिकारी / कर्मचारी यांची स्वतंत्र समिती नियुक्त करून संबंधित कामकाज वरील नमूद मुदतीत पूर्ण करून घ्यावे. सदर सेवकांचे नियुक्तीचे आदेश संबंधित उप आयुक्त, परिमंडळ क्र. १ ते ५ व मुख्य कामगार अधिकारी यांनी त्यांचे स्तरावरून पारित करावेत. निवृत्तीवेतन प्रकरणांबाबत मुख्य लेखापरीक्षण विभागाने नोंदविलेल्या आक्षेपांची पूर्तता संबंधित खात्याने ४८ तासांत करून अशी प्रकरणे मुख्य लेखापरीक्षण विभागाकडे फेर सादर करण्याची कार्यवाही करावी. पुढील ६ महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांचे सेवापुस्तकांची येणाऱ्या जून अखेरपर्यंत प्राधान्याने तपासणी करावी. संबंधित खातेप्रमुख यांनी निवृत्तीवेतन प्रकरणांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे वेळेत संकलित व पडताळणी करून संबंधित विभागास सादर करावीत.  संबंधित खातेप्रमुख आणि मुख्य कामगार अधिकारी यांनी याबाबत दरमहा आढावा बैठक घेऊन निवृत्तीवेतन प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. असे आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: