Sunil Shinde | कोलंबो परिषदेसाठी सुनील शिंदे यांची निवड!

HomeBreaking News

Sunil Shinde | कोलंबो परिषदेसाठी सुनील शिंदे यांची निवड!

Ganesh Kumar Mule Apr 26, 2026 1:36 PM

Mosquito Tornados in Kharadi | पुणे महापालिका उपायुक्तांना जलपर्णी भेट! | जाणून घ्या काय आहे प्रकरण 
PMC 74 th Anniversary | महापालिका वर्धापनदिन निमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनात काष्ठशिल्प, जुन्या नाण्यांचा संग्रह!
PMC Property Tax Department | मतदार यादी पुनरीक्षणामुळे मिळकत कर विभागाच्या सेवांमध्ये विलंब होणार |  पुणेकर नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Sunil Shinde | कोलंबो परिषदेसाठी सुनील शिंदे यांची निवड!

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे येथील नगरसेवक आणि कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड यु एन आय ग्लोबल युनियनद्वारे श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या असंघटित कामगारांच्या परिषदेसाठी करण्यात आली आहे. ही परिषद 27, 28, आणि 29 तारखेला कोलंबो येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या परिषदेसाठी भारत, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान येथील विविध कामगार प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. परिषदेमध्ये आरोग्य विभागात कार्यरत असंघटित कामगारांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असून, विविध देशांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या कायद्याविषयी सखोल माहिती देण्यात येईल.

सुनील शिंदे यांची परिषदेसाठी निवड ही त्यांच्या कामगार चळवळीतल्या योगदान आणि कामकाजातील प्रभावी नेतृत्वामुळे झाली आहे. या परिषदेमध्ये सुनील शिंदे विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडतील आणि असंघटित कामगारांच्या हक्कांचे संरक्षण कसे केले जाऊ शकते, यावर चर्चा करणार आहेत.

या परिषदेमध्ये असंघटित कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी विविध योजना, धोरणे आणि जागरूकता निर्माण करण्यावर विशेष लक्ष दिले जाईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: