International Book Day | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा 

HomeBreaking News

International Book Day | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा 

Ganesh Kumar Mule Apr 25, 2026 7:49 PM

विज्ञान कथेमध्ये भविष्याचा वेध घेण्याची क्षमता | डॉ. संजय ढोले
Annasaheb Waghire College : स्त्री पुरुष दोघेही वेगळे नसून परस्परपूरक व माणूसकीच्या पातळीवर एकच आहेत : रश्मी पटवर्धन यांनी व्यक्त केले विचार 
Annasaheb Waghire College : मराठी भाषा सकस, समृद्ध व सक्षम बनविण्याचे काम प्रत्येकाचे : डॉ. वसंत गावडे यांचे प्रतिपादन 

International Book Day | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

 

Annasaheb Waghire College – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात गुरुवार, २३ एप्रिल रोजी मराठी, हिंदी,इंग्रजी व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन व मृत्यु दिन जागतिक पुस्तक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश शिरसाट व मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी दिली. (Pune News)

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रंथपूजनाने करण्यात आली. या निमित्ताने अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉ.आशुतोष ठाकरे यांनी महान साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांच्या साहित्य कार्याचा विशेष आढावा घेतला. ते म्हणाले, “शेक्सपियरने सुमारे ३८ नाटके, १५४ सॉनेट्स तसेच अनेक काव्यरचना लिहिल्या असून जागतिक साहित्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.”

या दिनाचे औचित्य साधून डॉ. रमेश गोपाळे, डॉ.विलास पाटील, डॉ.अमोल बिबे,  अगस्ती ऋषी तोरडमल यांनी संपादित केलेल्या “रिसेंट ट्रेंड्स इन आर्ट्स, कॉमर्स अँड मॅनेजमेंट” या पुस्तकाचे प्रकाशन ओतूर गावच्या माजी सरपंच व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ.छाया तांबे व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.डॉ.गोपाळे यांनी आधुनिक साहित्याचे प्रवाह व त्यातील बदलते ट्रेंड्स यावर भाष्य करून दासू वैद्य यांच्या “पुस्तक” कवितेचे सादरीकरण केले.

ग्रंथपाल डॉ.एन.एच हांडे प्रास्ताविकात म्हणाले,”विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासावी, विविध प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास करावा. पुस्तकच आपल्याला तारणार आहेत.”

उपप्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. के. डी. सोनावणे यांनी शेक्सपिअर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये, त्यातील नाट्यगुण, तसेच मानवी जीवनातील विविध भावनांचे केलेले चित्रण याबद्दल माहिती दिली. शेक्सपियरचे जीवन चरित्र व जागतिक दर्जाचे समृद्ध साहित्य याचा आजच्या काळाशी असलेला सहसंबंध आपल्या व्याख्यानातून मांडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट यांनी ग्रंथालयाचे महत्त्व, वाचनसंस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पुस्तकांची भूमिका यावर प्रकाश टाकला.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन ज्ञानवृद्धीस चालना मिळावी. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध विषयांवरील पुस्तके विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी व वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली.

सदर प्रसंगी डॉ.रोहिणी मदने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन डॉ. वसंत गावडे यांनी केले व आभार प्रा. जनार्दन नाडेकर यांनी मानले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: