Prajit Nair IAS | मालमत्ता विवरणपत्र ३१ मे पर्यंत सादर करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश
| वर्ग १ ते ३ मधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विवरणपत्र देणे बंधनकारक
Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका कायद्यानुसार पालिकेच्या १ ते ३ ऱ्या गटातील सर्व कामगार व अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दरवर्षी ३१ मे पूर्वी ही माहिती द्यावी लागते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी विवरणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विहित कालावधीत विवरणपत्र सादर नाही झाल्यास ते गैरवर्तन मानले जाईल आणि शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त यांनी दिला आहे. (PMC Employees and Officers)
– महापालिका कायद्यानुसार तपशील देणे बंधनकारक आहे
महानगरपालिकेच्या इमारतीत आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये २० हजारांहून अधिक कामगार काम करतात. श्रेणी १ ते श्रेणी ४ कर्मचारी यामध्ये काम करतात. राज्य सरकारच्या सूचनेनुसार श्रेणी ४ वगळता सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पालिका त्यावर अमल करत आहे. या तपशिलाचा अहवाल ३१ मेपूर्वी सादर करण्याच्या सूचना महापालिकेच्या प्रत्येक विभागाला देण्यात आल्या आहेत. तरीही त्यांच्या मालमत्तेचा तपशील पालिका कर्मचारी व अधिकारी मांडत नाहीत.
अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी आदेशित केले आहे की, ३१ पूर्वी विवरण पत्र दाखल करावेत. वर्ग १ मधील अधिकाऱ्यांनी त्यांचे नियंत्रक असलेल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्फत पत्र द्यावे. तर वर्ग २ आणि ३ मधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या विभाग प्रमुखांना सादर करावीत.
अतिरितक आयुक्त यांनी आदेशात पुढे म्हटले आहे कि, प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांनी आपली विवरणपत्र राज्य सरकारकडे ३० जून पूर्वी सादर करावीत.

COMMENTS