Ganesh Bidkar on Hoarding Policy | वादाच्या भोवऱ्यात सापडलेले होर्डिंग धोरण न करण्याचा निर्णय | सभागृह नेते गणेश बिडकर यांची घोषणा 

HomeBreaking News

Ganesh Bidkar on Hoarding Policy | वादाच्या भोवऱ्यात सापडलेले होर्डिंग धोरण न करण्याचा निर्णय | सभागृह नेते गणेश बिडकर यांची घोषणा 

Ganesh Kumar Mule Apr 23, 2026 9:03 PM

Pune Mayor Election | पुणे महापौर, उपमहापौर पदासाठी तिरंगी लढाई | उपमहापौर च्या निवडणुकीत भाजप काय भूमिका घेणार? विविध राजकीय चर्चांना उधाण!
Pune BJP Vs Pune Congress | पुण्याच्या वाहतुक कोंडीला काँग्रेसच जबाबदार | भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची टीका
BJP Pune Membership | पुणे शहरात भाजपाचे सदस्यता अभियान

Ganesh Bidkar on Hoarding Policy | वादाच्या भोवऱ्यात सापडलेले होर्डिंग धोरण न करण्याचा निर्णय | सभागृह नेते गणेश बिडकर यांची घोषणा

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिकेकडून होर्डिंग धोरण तयार करण्यात आले आहे. मात्र हे धोरण वादाच्या भोवऱ्यात सापडले. यावरून स्थायी समिती अध्यक्ष आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे हे धोरण रद्द करण्याचा निर्णय भाजप कोअर टीम ने घेतला आहे. अशी माहिती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली. दरम्यान याबाबत स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना विचारले असता त्यांनी आपल्याला याबाबत कुठलीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली. (PMC House Leader Ganesh Bidkar)

सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कि, होर्डिंग धोरण बाबत स्थायी समिती अध्यक्ष यांचा कुठलाही वेगळा आग्रह नाही. मात्र यामुळे वाद झाल्याने  पार्टी म्हणून हे धोरण न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आता प्रशासनाने योग्य तो प्रस्ताव करावा. पुणेकरांचे  हित ज्यात असेल असाच प्रस्ताव प्रशासनाने आणावा. आम्ही भाजप पार्टी म्हणून  योग्य निर्णय घेऊ.

बिडकर यांनी पुढे सांगितले कि, महापालिका प्रशासनाने भविष्यात असे नाविन्यपूर्ण प्रस्ताव आणले तर भाजपच्या नेतृत्वात  एकत्रित निर्णय घेतला जाईल. आमची पार्टी पुणेकरांची हिताला बांधील आहे. पुणेकरांच्या  हिताचे निर्णय आम्ही  घेणार. मात्र नाविन्यपूर्ण प्रस्ताव आणताना  प्रशासनाने योग्य ती खातरजमा करावी. आम्ही निर्णय करू.

केबलची नोंद महापालिकेत असायला हवी

ओव्हरहेड केबल धोरण बाबत बोलताना बिडकर यांनी सांगितले कि, शहरात बऱ्याच कंपन्यांच्या केबल अनधिकृत आहेत. त्यामुळे महापालिकेत या केबलची नोंद  असावी. त्यात पारदर्शकता आणायला हवी. त्याचे मोजमाप व्हायला हवे. तो एक उत्पन्नाचा स्रोत होऊ शकेल म्हणून स्थायी समिती अध्यक्ष यांच्या नेतृत्वात  कारवाई करण्यात येत होती. यात एक सुसूत्रता असावी म्हणून आता धोरण केले जाणार आहे. तोपर्यंत कारवाई बंद असणार आहे.

RMC प्लांट नी MPCB च्या मानकांचे पालन करावे

शहरात महापालिका प्रशासनाकडून RMC प्लांट वर कारवाई केली जात होती. मात्र ही कारवाई बंद करण्यात आली. काही भागात कारवाई करण्यात आली. तर काही भागात कारवाई झाली नाही. यावरून सभागृह नेते गणेश बिडकर यांना छेडले असता ते म्हणाले, प्लांट ची शहरात गरज आहे. मात्र त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही नियम घालून दिले आहेत. त्याचे पालन प्लांट धारकांनी करणे आवश्यक आहे. आमचा कुणाला विरोध नाही. मात्र ते प्लांट धारक शहराला त्रास देतील, त्यांना आम्ही बाहेरचा रस्ता दाखवू.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: