PMC Nadi Swachhata Abhiyan | जागतिक वसुंधरा दिनानिमित्त  घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण विभागामार्फत  नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन

Homeadministrative

PMC Nadi Swachhata Abhiyan | जागतिक वसुंधरा दिनानिमित्त  घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण विभागामार्फत  नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन

Ganesh Kumar Mule Apr 22, 2026 7:44 PM

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याचे महापौरांचे आदेश
PMC Labour Welfare Department | कोविड कर्तव्य बजावताना दिवंगत झालेल्या ११ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाखांचे अनुदान वितरित
PMC Merged Villages Property tax | समाविष्ट गावांतील कर आकारणीची समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची समिती गठीत केली जाणार! 

PMC Nadi Swachhata Abhiyan | जागतिक वसुंधरा दिनानिमित्त  घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण विभागामार्फत  नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग व पर्यावरण विभागामार्फत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त २२ एप्रिल  रोजी “नदी महोत्सव २०२६- स्वच्छ नदी, स्वस्थ पुणे” या शहरस्तरीय नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)

नदी ही केवळ वाहणारे पाणी नसून ती आपल्या संस्कृतीची, जीवनशैलीची आणि अस्तित्वाची ओळख आहे. हीच जाणीव समाजात निर्माण करण्यासाठी आणि “स्वच्छ नदी – समृद्ध जीवन” या संदेशाला कृतीची जोड देण्यासाठी पुणे महानगरपलिका घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण विभागामार्फत नदी महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाच्या माध्यमातून नदी स्वच्छता, जनजागृती, लोकसहभाग आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त  स. ६.३० ते १०.०० या वेळेत विठ्ठल मंदिर, विठ्ठलवाडी, सिंहगड रोड याठिकाणी “नदी महोत्सव २०२६” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  मोहिमेचे उद्घाटन समारंभ महापौर यांचे हस्ते करण्यात आला. किशोरी शिंदे, उप आयुक्त, पर्यावरण विभाग यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना दिली. यामध्ये पंतप्रधान यांनी दिलेल्या मिशन लाईफच्या संकल्पनेनुसार प्रत्यकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्या पाहिजेत याची आठवण करून दिली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानच्या माध्यमातून आपण पर्यावरणातील पंचमहाभूते भूमी, जल, वायु, अग्नि व आकाश यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, बँड सादरीकरण तसेच नदी संवर्धनावर आधारित माहितीपट सादर करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत नदी गीताचे व माहितीपटाचे अनावरण महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले.

नदी स्वच्छता व संवर्धनाबाबत मनोगत व्यक्त करताना आयुक्त यांनी नदी महोत्सव यांसारखे उपक्रम वारंवार आयोजित केले पाहिजे तसेच युनायटेड नेशनच्या शाश्वत विकास ध्येयांवर विविध विभागांच्या ‘माध्यामातून काम करणे आवश्यक आहे असे सांगितले. याशिवाय मिशन लाईफच्या प्रत्येक मुद्यांवर काम केल्यास वाराणसी घाट जसा जागतिक दर्जा प्राप्त करू शकतो व पटना शहरातील नदीचा घाट हा एक सुंदर पर्यटन स्थळ होवू शकतो, त्याचप्रमाणे पुणे शहरातील सर्व नागरीकांनी प्रशासनासोबत काम केल्यास मुळा-मुठा नदीच्या प्रदूषण कमी होवून लोकसहभागातून येत्या एक ते दिड वर्षांमध्ये नदीचा कायापालट आपण सर्वजण करू शकतो असा विश्वास व्यक्त केला.

महापौर  मंजुषा नागपुरे यांनी मनोगत व्यक्त करताना महापालिका आवारात प्लास्टिक बंदी करण्याचे आव्हान प्रशासनास दिले. पर्यावरण संवर्धनाकारीता सर्व स्तरांतून प्रयत्न करणे आवश्यक आहे व प्रदूषणाच्या समस्यांचे निराकरण करताना नागरिकांना पर्याय देखील उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. शहरातील विविध प्रकारचे प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, तज्ञ व्यक्ती, स्टार्टअप यांच्या सूचना आभ्यास व उपाययोजना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्त आपला ग्रह, आपली उर्जा असून आपण सर्वांनी मिळून एकत्र काम केल्यास आपले पुणे स्वच्छ पुणे, स्वस्थ पुणे होवू शकते अशी आशा व्यक्त केली. याप्रसंगी उपमहापौर व इतर मान्यवर यांनी देखील मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.

या उपक्रमाच्या अनुषंगाने  १६ ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीमध्ये संगम वाडी, ओंकारेश्वर तसेच शहरातील सर्व नदी पात्रांमध्ये व घाटांमध्ये डीप क्लीन ड्राइव्ह आयोजित करण्यात आले. या डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत नदीच्या पात्राच्या परिसरातून ४.२ टन प्लॅस्टिक, १२.३ टन राडारोडा व ७.४ टन इतर कचरा गोळा करण्यात आला. यात २ हजार नागरिकांनी सहभाग घेतला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: