Pune PMC News | समान पाणी योजनेतील पाण्याच्या टाक्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण | महापौर आणि सभागृह नेते यांनी घेतला आढावा 

Homeadministrative

Pune PMC News | समान पाणी योजनेतील पाण्याच्या टाक्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण | महापौर आणि सभागृह नेते यांनी घेतला आढावा 

Ganesh Kumar Mule May 15, 2026 9:23 PM

Mayor Manjusha Nagpure | एकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा : महापौर मंजुषा नागपुरे
Gas Cylinder Shortage in Pune | गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सुचना | गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
PMC 101 School Closed | वारकऱ्यांच्या सेवेसाठी  जिथे दिंड्या उतरतात त्या पुणे महापालिकेच्या १०१ शाळांना येत्या रविवार पर्यंत सुट्टी | १२ जुलैपर्यंत पाणी कपात रद्द |  महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा 

Pune PMC News | समान पाणी योजनेतील पाण्याच्या टाक्यांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण | महापौर आणि सभागृह नेते यांनी घेतला आढावा

 

Pune News – (The Karbhari News Service)-   महापालिकेच्या समान पाणी पुरवठा प्रकल्पा’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीची महापौर मंजूषा नागपुरे आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांनी  पाहणी करून आढावा घेतला. (Pune Municipal Corporation – PMC)

महादेववाडी-उंड्री व एनआयबीएम परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या पाणीप्रश्नाला आता दिलासा मिळणार असून ‘समान पाणी पुरवठा प्रकल्पा’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या नव्या पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते रविवार १७ मे रोजी दुपारी १.०० वाजता घुले चौक, दोराबजी मॉल जवळ, उंड्री येथे संपन्न होणार आहे.

यावेळी  विधानपरिषद आमदार  योगेश टिळेकर,  सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम,  अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी करत आढावा घेतला.
———

कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपादन कामाचा महापौर आणि आयुक्तांनी घेतला आढावा

कात्रज कोंढवा येथील भुसंपादन चालू असलेल्या ठिकाणी महापौर मंजुषा नागपुरे व महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष जागा पाहणी करून आढावा घेतला.

कात्रज व कोंढवा येथील कात्रज चौक ते पिसोळीपर्यंत ८४ मीटर विकास योजना रस्त्यापैकी ५० मीटर विकास योजना रस्त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही शासनामार्फत सुरू होती. २७ एप्रिल रोजी सुमारे ४१,००० चौ. मी. क्षेत्राचा निवाडा विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक १५ पुणे यांचे मार्फत जाहीर झालेला आहे.

पुणे महानगरपालिकेने प्रस्तुत भूसंपादनाकरिता सुमारे १९७ कोटी रुपये शासनाकडे जमा केलेली आहे. तदनंतर निवाड्याची व ताबेबाबत पंधरा दिवसांची नोटीस देऊन १४ मे पासून प्रत्यक्ष ताबे घेण्यास सुरुवात केलेली आहे. १४ आणि १५ या दोन दिवसांमध्ये एकूण १०९ मिळकतींपैकी ४८ मिळकती ताब्यात घेण्यात आलेले असून जवळपास २५००० चौ. मी. क्षेत्र पुणे मनपाच्या ताब्यात आलेले आहे.

NHAI मार्फत चालू असलेले कात्रज उड्डाणपूल उतरण्यासाठी आवश्यक असलेली जागा आज ताब्यात घेण्यात आलेली असून सदर ठिकाणी पथ विभागामार्फत काम सुरु करण्यात आलेले आहे. यामुळे या उड्डाणपूलाचे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

याप्रसंगी आमदार योगेश टिळेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, प्रभाग समिती अध्यक्ष रंजना टिळेकर, नगरसेविका अर्चना जगताप, पुजाताई कदम, अति.महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे अधिक्षक अभियंता अजित बांबळे, भुसंपादन अधिकारी श्वेता दारुणकर व इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: