Prashant Waghmare News | माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या समर्थनार्थ अभियंता संघ मैदानात!

Homeadministrative

Prashant Waghmare News | माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या समर्थनार्थ अभियंता संघ मैदानात!

Ganesh Kumar Mule Apr 06, 2026 8:16 PM

Pune CP Amitesh Kumar | गणेशोत्सव निर्विघ्न व निर्भयपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC Security Guard | पुणे महापालिकेत नव्या 32 गावांसाठी 500 अतिरिक्त सुरक्षा रक्षक घेण्यास स्थायी समितीची मंजुरी
NCP Vs Chandrakant patil | चंद्रकांत पाटील यांची तात्काळ मंत्री मंडळातून हकलपट्टी करावी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

Prashant Waghmare News | माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या समर्थनार्थ अभियंता संघ मैदानात!

 

PMC Engineers Association – (The Karbhrari News Service) – पुणे महापालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या संदर्भात केलेल्या तक्रारीनुसार मुंबई उच्च न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणावरून आता महापालिका अभियंता संघाने प्रशांत वाघमारे यांचे समर्थन करत त्यांची पाठराखण केली आहे. शिवाय चौकशी होवून सत्य परिस्थिती समोर येईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध  करू नयेत. असे आवाहन संघाने प्रसार माध्यमांना केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

संघाचे अध्यक्ष मुक्ता मनोहर आणि सचिव सुनील कदम यांनी जारी केलेल्या निवेदन नुसार  गेले दोन दिवस पुणे महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता  प्रशांत वाघमारे यांच्याविरोधात प्रसारमाध्यमांमधून काही बातम्या प्रसिद्ध होत आहे. तथापि त्यातून चुकीचा संदेश समाजामध्ये जात असून यामधून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुणे महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांचे संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने केवळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही प्रकारचा अंतिम निष्कर्ष काढलेला नाही अथवा त्यांना दोषी ठरवलेले नाही. तसेच, न्यायालयाने या आदेशा संदर्भात पुढील १५ दिवसांची स्थगिती आदेश (Stay Order) देखिल दिलेले आहेत. हि प्रक्रिया ही केवळ प्राथमिक चौकशी स्वरूपाची आहे. यामुळे यावरून कोणतेही निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. असे निवेदनात म्हटले आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: