Rahul Gandhi | लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर | मोहन जोशी राहिले जामीनदार  

HomeBreaking News

Rahul Gandhi | लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर | मोहन जोशी राहिले जामीनदार  

Ganesh Kumar Mule Jan 10, 2025 8:52 PM

Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील शक्ती स्थळांवरून मातीचे संकलन |पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपक्रम
PM Vishwakarma Scheme 2023 | पंतप्रधान मोदी एक नवीन योजना सुरू करत आहेत | अर्ज करण्याची ही अट आहे
Compensation | मार्चमधील अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी | शेतकऱ्यांना दिलासा

Rahul Gandhi | लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर | मोहन जोशी राहिले जामीनदार

 

 

Mohan Joshi Congress – (The Karbhari News Service) – पुणे येथील प्रथम वर्ग न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्या न्यायालयात फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते  राहुल गांधी यांनी लंडन येथील एका कार्यक्रमात विनायक सावरकर यांचे विषयी बदनामी होईल असे वक्तव्य केले होते.

या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे येथील न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. बदनामीच्या खटल्यात राहुल गांधी यांना न्यायालया समोर आज व्यक्तीशः उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने सांगितले होते. राहुल गांधी यांचे वकील  मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांच्या वतीने आज न्यायालयात अर्ज दाखल केला.  राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते असून त्यांना हाय सिक्युरिटी आहे. अशा परिस्थितीत न्यायालय समोर स्वतः व्यक्तीच्या उपस्थित राहणे सर्वांनाच त्रासदायक होईल. सर्वोच्य न्यायालय, ऊच्च न्यायालयाच्या निर्देशा नुसार आरोपी व्हीडिओ काॅन्फरसिंग द्वारे न्यायालया समोर उपस्थितीत राहू शकतात आणि म्हणून राहुल गांधी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या सुविधे वरून न्यायालयासमोर उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी असा अर्ज राहूल गांधी यांचे वकील अ‍ॅड मिलिंद पवार यांनी न्यायालयात केला. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला.

त्यानंतर राहूल गांधी यांना पुणे जिल्हा न्यायालयातून दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात मेल वरून लिंक पाठवण्यात आली. राहुल गांधी त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयातून न्यायालया समोर जवळपास २० मिनीटे शांत बसून होते. न्यायाधीश शिंदे यांनी त्यांना नाव विचारले. राहूल गांधी यांनी न्यायालयाचे आभार मानले.

त्यानंतर अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांना खटल्यात जामीन मिळावा या साठी अर्ज केला. जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर करून रुपये पंचवीस हजाराच्या जात मुचलक्यावर राहुल गांधी यांची बदनामीच्या खटल्यात जामीन मंजूर केला. राहुल गांधी यांच्या वतीने माजी आमदार  मोहन जोशी यांनी राहुल गांधी यांचा जामीन जामीन स्वीकारला.

त्यानंतर अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांना सदर खटल्यामध्ये प्रत्येक तारखेस त्यांच्या वतीने त्यांचे वकील अ‍ॅड मिलिंद पवार हेच उपस्थित राहतील. निकालाच्या वेळीच श्री. राहुल गांधी न्यायालयासमोर उपस्थित राहतील. तशी परवानगी मिळावी असा अर्ज अ‍ॅड मिलिंद पावर यांनी केला तो अर्ज देखील न्यायालयाने मंजूर केला. मागील तारखेस फिर्यादी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी कोर्टाचा अवमान केला, राहूल गांधी यांना न्यायालयाचे समन्स मिळूनही ते न्यायालयात व्यक्तीच्या उपस्थित झाले नाहीत म्हणून त्यांना पकड वाॅरंट काढावे व जामीनपात्र वाॅरंटही काढावे असे तीन प्रकारचे अर्ज केले होते.

तीनही अर्जावर आज अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने न्यायालयाने फिर्यादी यांचे तिनही अर्ज फेटाळून लावले. दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी या खटल्याची पुढील सुनावनी होणार आहे. या खटल्यामध्ये अ‍ॅड. मिलिंद पवार यांना अ‍ॅड.योगश पवार अ‍ॅड.हर्षवर्धन पवार, अ‍ॅड.अजिंक्य भालगरे, अ‍ॅड.सुयोग गायकवाड, अ‍ॅड. प्राजक्ता पवार भोसले व अ‍ॅड. ज्ञानेश्वरी जाधव यांनी मदत केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0