Ashok Kharat Case Pune Protest | मंत्र्यांची चौकशी करा | रुपाली चाकणकरांना अटक करा – पुणे शहर महिला काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन

HomeBreaking News

Ashok Kharat Case Pune Protest | मंत्र्यांची चौकशी करा | रुपाली चाकणकरांना अटक करा – पुणे शहर महिला काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन

Ganesh Kumar Mule Mar 21, 2026 4:44 PM

Youth Congress Agitation | नसरापूर प्रकरणी युवक काँग्रेसचे धायरी येथे रास्ता रोको आंदोलन; पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
Pune News | युजर चार्जेसविरोधात राज्यातील व्यापाऱ्यांचा एल्गार – कायदा तातडीने रद्द करण्याची व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी परिषदेत मागणी
PMC Standing Committee Chairman Election | येत्या सोमवारी (ता. २३) स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक | १८ तारखेला अर्ज स्वीकारले जाणार 

Ashok Kharat Case Pune Protest | मंत्र्यांची चौकशी करा | रुपाली चाकणकरांना अटक करा – पुणे शहर महिला काँग्रेसचे ‘जोडे मारो’ आंदोलन

 

Pune Women Congress – (The Karbhari News Service) – भोंदूबाबा खरात यांच्याशी संबंध असलेल्या मंत्र्यांची त्वरीत चौकशी करा आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांना अटक करा, अशा मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने आज शनिवारी सकाळी फर्ग्युसन कॉलेज रोड येथे आंदोलन करण्यात आले. (Pune Breaking News)

पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. रूपाली चाकणकर यांनी महिलांच्या चारित्र्याशीच खेळ केला, हा गुन्हा अक्षम्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा भंग आणि महिलांचे शोषण केलेल्या खरात या भोंदू बाबाला संरक्षण दिल्याबद्दल रुपाली चाकणकरांना अटक झालीच पाहिजे. महाराष्ट्रातील एपस्टीन खरात याची ३० दिवसांत चौकशी करा. तसेच त्या बाबाच्या अनेक गैरकृत्यात सहभागी असलेल्या मंत्र्यांची त्वरीत चौकशी झाली पाहिजे, असे स्वाती शिंदे यांनी मागणी केली.

फुले, शाहू, आंबेडकर यांची परंपरा मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकावे, अशी मागणी स्वाती शिंदे यांनी आंदोलकांच्या वतीने केली.

आंदोलन फर्ग्युसन कॉलेज रोड येथे जोषपूर्ण झाले. ‘मंत्र्यांनो खुर्चा खाली करा’, ‘भोंदूबाबा खरातला कडक शासन करा’, अशा आशयाच्या घोषणांचे फलक आंदोलकांनी हाती घेतले होते. भोंदूबाबा खरात आणि रुपाली चाकणकर यांच्या प्रतिमांना जोडे मारण्यात आले.

पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अर्चना शाह, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, रेखा जैन, अंजली सोलापूरे, राजश्री दामले-चव्हाण, रुपाली पवार, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, अंजली देसाई, सुवर्णा माने, सुरेखा मारणे, गीतांजली तसेच इतर महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: