Warje Karvenagar Ward Office | वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत अतिक्रमणावर जोरदार कारवाई | १०,००० चौरस फूट भाग अतिक्रमण मुक्त

Homeadministrative

Warje Karvenagar Ward Office | वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत अतिक्रमणावर जोरदार कारवाई | १०,००० चौरस फूट भाग अतिक्रमण मुक्त

Ganesh Kumar Mule Mar 20, 2026 10:46 PM

Naval Kishore Ram IAS | मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई | महापालिका आयुक्त यांचा इशारा 
Independence Day | पुणे महानगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Pune Shivsena | भाजपने त्या माजी नगरसेवकांना तंबी द्यावी अन्यथा… | शिवसेनेचा इशारा !

Warje Karvenagar Ward Office | वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत अतिक्रमणावर जोरदार कारवाई | १०,००० चौरस फूट भाग अतिक्रमण मुक्त

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत आज रोजी अतिक्रमण निर्मूलन विभाग, परिमंडळ ३ व बांधकाम विकास विभाग अशी संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये १०,००० चौरस फूट भाग अतिक्रमण मुक्त करण्यात आला. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Encroachment Action)

वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत समर्थ पथ, गुलाबराव ताठे पथ, ताथवडे उद्यान पथ परिसर येथे अनधिकृत व्यवसाय व बांधकामावर अतिक्रमण निरीक्षक मंदार राजकुमार करंजे, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक अविनाश चव्हाण, तेजस दाभाडे, अमोल भालेराव, लक्ष्मण जोंधळे, धनकवडी सहकारनगर कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक सागर विभूते सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक मंथन आमले, अतिक्रमण निरीक्षक श्री राहुल डोके कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय,महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, बिगारी सेवक यांच्या मदतीने करण्यात आली.

 

यात ४ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये, लोखंडी जाळ्या, हातगाड्या, पथारी, काउंटर, टेबल, खुर्ची, पुतळे व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग उप आयुक्त सोमनाथ बनकर, स.उप आयुक्त तथा मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश शेलार, महापालिका सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे/धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली. तसेच बांधकाम विकास विभागाचे उप अभियंता कलशेट्टी उपस्थित होते.

अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढे देखील वारंवार व नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निरीक्षक मंदार राजकुमार करंजे यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: