Pune PMC Devlopment Work Bill | विकास कामांची बिले २५ मार्च पर्यंत सादर करता येणार | १० दिवसांची मुदतवाढ दिली

Homeadministrative

Pune PMC Devlopment Work Bill | विकास कामांची बिले २५ मार्च पर्यंत सादर करता येणार | १० दिवसांची मुदतवाढ दिली

Ganesh Kumar Mule Mar 20, 2026 7:45 PM

Ink Attack | पालकमंत्र्यांवरील शाईहल्ल्याविरोधात पुणे भाजपकडून निषेध आंदोलन !
Prmaod Nana Bhangire on Water Issue | शिवसेना शहर प्रमुखांचा हंडा मोर्चा काढण्याचा महापालिका आयुक्तांना इशारा!
Navale Bridge Accident | नऱ्हे ते रावेत व्हाया सुतारवाडी या उन्नत मार्गाला गती देणार | केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवले पूल परिसराला भेट देत केली पाहणी

Pune PMC News | विकास कामांची बिले २५ मार्च पर्यंत सादर करता येणार | १० दिवसांची मुदतवाढ दिली

 

Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या विविध विभागाकडून आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असतानाही अखेरच्या दिवसापर्यंत कामाची बिले सादर करतात. यामुळे या महिन्यात प्रमाणाबाहेर खर्च झालेला दिसतो. हे प्रकार बंद करण्यासाठी १५ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव पुन्हा १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. बिले २५ मार्च पर्यंत सादर करता येणार आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Naval Kishore Ram IAS)

आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाने सन २०२५-२६  या आर्थिक वर्षामध्ये विविध विकास कामांसाठी अंदाजपत्रकीय तरतूदी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात देयके अदा करण्यासाठी सादर केली जातात. त्यामुळे या महिन्यात प्रमाणाबाहेर खर्च (Rush of Expenditure) झालेला दिसतो. सदर बाब वित्तीय नियमांशी विसंगत असून प्रशासकीय दृष्ट्याही उचित नसल्याने सन २०२५- २६ या आर्थिक वर्षात तरतूद केलेल्या कामांची देयके१५  मार्च पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

आदेशात म्हटले आहे की, मात्र काही कारणास्तव पुन्हा १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. बिले २५ मार्च पर्यंत सादर करता येणार आहेत. त्यानंतर  कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

सर्व खातेप्रमुख यांनी आपले विभागातील सर्व संबधितांना वरील बाबतची सूचना देऊन विहित केलेल्या वेळेत बिले मुख्य लेखा व वित्त विभागाकडे पाठविण्याची सर्व खाते प्रमुख यांनी दक्षता घ्यावी. असेही आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: