PMC Standing Committee on Illegal Construction | एखादे अनधिकृत बांधकाम ५ मजल्या पर्यंत वाढण्याची वाट पाहू नये | स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला सुनावले  

Homeadministrative

PMC Standing Committee on Illegal Construction | एखादे अनधिकृत बांधकाम ५ मजल्या पर्यंत वाढण्याची वाट पाहू नये | स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला सुनावले  

Ganesh Kumar Mule Mar 06, 2026 7:46 AM

PMC Solid Waste Management Department | महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त घनकचरा विभागाकडून स्वच्छता मशाल रैली, श्रमदान, प्लागेथोन चे आयोजन 
Kasaba By-Election | ही पुण्याची राजकीय संस्कृती नाही | कसबा पोटनिवडणूक वरून प्रशांत जगताप यांनी स्वपक्षातील लोकांना सुनावले
Subways | PMC Pune | विद्यापीठ रस्त्यावर होणार तीन भुयारी मार्ग! महापालिका आयुक्तांची माहिती

PMC Standing Committee on Illegal Construction | एखादे अनधिकृत बांधकाम ५ मजल्या पर्यंत वाढण्याची वाट पाहू नये | स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला सुनावले

| अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करा | नियमित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची स्थायी समितीची सूचना

 

Shirnath Bhimale – (The Karbhari News Service) – शहरात अनधिकृत बांधकामे उभी राहात असताना प्रशासनाचे त्याकडे लक्ष जात नाही.  ही बांधकामे उभी राहिल्यानंतर त्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे अनधिकृत बांधकामांचा पाया घातला जात असतानाच ही बांधकामे थांबवा. एखादे अनधिकृत बांधकाम ५ मजल्या पर्यंत वाढण्याची वाट पाहू नये. अशा शब्दात स्थायी समिती अध्यक्ष आणि समिती सदस्यांनी प्रशासनाला सुनावले. (Pune Municipal Corporation – PMC)

अनधिकृत बांधकामे  होत असलेल्या हद्दीतील महापालिकेच्या अभियंत्यांवर  जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देश  स्थायी समितीने महापालिका प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी गुरुवारी दिली.

स्थायी समितीची बैठक गुरुवारी  भिमाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भिमाले यांनी ही माहिती दिली. महापालिकेतर्फे बुधवारी लोहगाव, विमाननगर  परिसरात कारवाई करत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त  करण्यात आली. यात  अनेक बांधकामे चार-पाच मजल्यांहून अधिक मोठी होती. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत  स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली.  ‘शहरात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. चार पाच मजली बांधकामे होत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व अन्य कर्मचाऱ्यांचे त्याकडे लक्ष कसे जात नाही. अधिकाऱ्यांचे आपल्या हद्दीत रोज लक्ष असणे गरजेचे आहे.  आपल्या हद्दीत अनधिकृत बांधकामे उभी राहिल्यास अधिकारी दोषी ठरतात. त्यामुळे अनधिकृत बांधकामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी,अशी सूचना प्रशासनाला केली आहे,’असे भिमाले म्हणाले.

‘बांधकाम विभागातील अधिकारी, क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नियमित आपापल्या हद्दींची पाहाणी करावी. सर्वेक्षण करावे आणि दर पंधरा दिवसांनी त्याचा अहवाल सादर करावा.  बांधकाम विभागाने हा अहवाल स्थायी समितीला सादर करावा. लोकप्रतिनिधी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या कारवाईला कोणीही विरोध करणार नाही,’असे भिमाले यांनी नमूद केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: