Dy Mayor Parshuram Wadekar | दर महिन्यास होणाऱ्या पहिल्या मुख्य  सभेमध्ये भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले जावे | उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा मुख्य सभेत प्रस्ताव 

HomeBreaking News

Dy Mayor Parshuram Wadekar | दर महिन्यास होणाऱ्या पहिल्या मुख्य  सभेमध्ये भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले जावे | उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा मुख्य सभेत प्रस्ताव 

Ganesh Kumar Mule Feb 21, 2026 7:13 PM

Dr Vasant Gawde | युवा पिढीसाठी मूल्य शिक्षण गरजेचे | प्रा. डॉ. वसंत गावडे 
Gopichand Padalkar Vs NCP | गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी | पुणे पोलिस आयुक्तांना दिले निवेदन
NCP Youth Kothrud | सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याबद्दल कोथरूड युवक राष्ट्रवादी ची अब्दुल सत्तर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

Dy Mayor Parshuram Wadekar | दर महिन्यास होणाऱ्या पहिल्या मुख्य  सभेमध्ये भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले जावे | उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा मुख्य सभेत प्रस्ताव

 

PMC General Body Meeting – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या दर महिन्यास होणाऱ्या पहिल्या सभेमध्ये भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्याची मागणी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केली आहे. प्रस्ताविकेचे वाचन  महापौर, उपमहापौर अगर सभेस उपस्थित असलेल्या त्या-त्या वेळचे सभापती यांचे मार्फत करण्यात येऊन, सभेस उपस्थित असलेले सर्व  सदस्य, अधिकारी व सेवकांनी त्यांचे वाचन करुन, भारतीय संविधानाप्रती एक भारतीय नागरीक म्हणून असलेला आपला आदर, आपले कर्तव्य व जबाबदारी वृध्दीगत करावी. असा प्रस्ताव उपमहापौर यांनी मुख्य सभेत सादर केला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि, भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा करणेबाबत देशाचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केले होते. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदासआठवले यांच्या सामाजिक न्याय विभागामार्फत याची कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने  महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय निर्गमित होऊन ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थांच्या वेळोवेळी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभा, मासिक सभा, ग्राम सभा इत्यादी सभांची सुरुवात भारतीय संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करावी, असा शासन निर्णय प्राप्त झालेला आहे.

शासन निर्णयानुसार मागील संपूर्ण वर्षभर प्रशासक कार्यकाळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या होणाऱ्या सर्व सर्वसाधारण सभा, मासिक सभा यामध्ये भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आलेले आहे.  ही परंपरा कायम ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या दर महिन्यास होणाऱ्या पहिल्या मुख्य सभेमध्ये भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले जावे. असे उपमहापौर यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: