Postal Life Insurance Policy | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पोस्ट विभाग देणार “पोस्टल लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी” ची  माहिती!

Homeadministrative

Postal Life Insurance Policy | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पोस्ट विभाग देणार “पोस्टल लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी” ची  माहिती!

Ganesh Kumar Mule Feb 20, 2026 9:03 PM

PMC Employees Promotion | वर्षभरात महापालिकेच्या ६०० कर्मचाऱ्यांना पदोन्नती | आयुक्तांच्या हस्ते दिल्या ऑर्डर, आज्ञापत्र 
PM Awards | पंतप्रधान पारितोषिक योजनेसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना 
Pavneet Kaur IAS | मान्सून कमकुवत | सामान्य पाऊस फक्त १४% | पुणे महापालिकेचा पाणी बचतीचा ‘अॅक्शन प्लॅन’!

Postal Life Insurance Policy | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पोस्ट विभाग देणार “पोस्टल लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी” ची  माहिती!

 

PMC Employees – (The Karbhari News Service)  – पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी आणि  कर्मचारी यांच्याकरीता पोस्ट विभागातर्फे “पोस्टल लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी” विषयक माहिती माहिती दिली जाणार आहे.  महानगरपालिका नवीन इमारतीचे तळ मजल्यावर दि.२०, २३ आणि  २४ फेब्रुवारी असे  तीन दिवसांकरीता पोस्ट विभागातर्फे “पोस्टल लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी” विषयक माहिती देणेकरीता स्टॉल कार्यान्वित करण्यात येणार आहेत. (PMC Officers)

पोस्ट विभागाचे प्रतीनिधीमार्फत पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना शासकीय कर्मचा-यांसाठी असलेल्या “पोस्टल लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी” बाबतची सर्व आवश्यक माहिती देण्यात येणार असून विमाधारकांना त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये आणि ऑनलाईन प्रीमियम भरण्याची सुविधा, पोस्टल लाईफ इन्शुरन्समध्ये आयकर सवलत, कर्ज सुविधा, नामांकन आणि हस्तांतरण इ. बाबतची माहिती देण्यात येणार आहे. तसेच याव्यतिरिक्त पूर्वीच्या विमा योजनांबाबत काही शंका, अडचणी असल्यास त्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

तरी या स्टॉलचा पुणे महानगरपालिकेमधील सर्व अधिकारी आणि  कर्मचारी यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0