Nilesh Nikam NCP Leader | राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निलेश निकम यांची नियुक्ती
Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत भाजपच्या एकहाती सत्तेला आणि बलाढ्य संख्याबळाला शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी खेळी खेळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अभ्यासू आणि आक्रमक नेते ॲड. निलेश निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (NCP Pune)
भाजपच्या ‘सुसाट वारूला’ लगाम घालण्यासाठी केवळ आक्रमकता नाही, तर प्रशासकीय अनुभवाची जोड आवश्यक होती. त्यासाठी निकम यांची निवड केल्याचे मानले जात आहे.
निकम हे 1992,1997,2002,व 2007 सलग विजयी झाले होते. त्यानंतर 2026 साली पाचव्यांदा निवडून आलेले निकम पालिका प्रशासनाचे जाणकार मानले जातात.
महत्त्वाची पदे: यापूर्वी त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेता म्हणून यशस्वी काम पाहिले आहे. ‘शहरी गरीब योजनेचे जनक’ म्हणून त्यांची ओळख आहे.
पेशाने वकील असल्याने सभागृहात सत्ताधाऱ्यांना नियमांच्या चौकटीत घेरण्यासाठी ते सक्षम आहेत. अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

COMMENTS