Nilesh Nikam NCP Leader | राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी  निलेश निकम यांची नियुक्ती

Homeadministrative

Nilesh Nikam NCP Leader | राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी  निलेश निकम यांची नियुक्ती

Ganesh Kumar Mule Jan 27, 2026 9:14 PM

TulsiBag | PMC | तुळशी बागेतील फक्त 4 व्यावसायिकांनी पूर्ण भाडे भरले  :19 मे पासून तुळशी बाग बंद 
Amit Shah in Pune | प्रत्येक क्षेत्रात देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा थोरले बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
PMC Pune Employees | मृत आणि सेवानिवृत्त सेवकांना देखील प्रशासनाकडून दिल्या जातात ऑर्डर  | सेवकांची यादी अद्ययावत केली जात नसल्याची माहिती 

Nilesh Nikam NCP Leader | राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी  निलेश निकम यांची नियुक्ती

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत भाजपच्या एकहाती सत्तेला आणि बलाढ्य संख्याबळाला शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी खेळी खेळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अभ्यासू आणि आक्रमक नेते ॲड. निलेश निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  (NCP Pune)

​
​भाजपच्या ‘सुसाट वारूला’ लगाम घालण्यासाठी केवळ आक्रमकता नाही, तर प्रशासकीय अनुभवाची जोड आवश्यक होती. त्यासाठी निकम यांची निवड केल्याचे मानले जात आहे.

​निकम हे  1992,1997,2002,व 2007 सलग विजयी झाले होते. त्यानंतर 2026 साली पाचव्यांदा निवडून आलेले निकम पालिका प्रशासनाचे जाणकार मानले जातात.
​महत्त्वाची पदे: यापूर्वी त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेता म्हणून यशस्वी काम पाहिले आहे. ‘शहरी गरीब योजनेचे जनक’ म्हणून त्यांची ओळख आहे.
​ पेशाने वकील असल्याने सभागृहात सत्ताधाऱ्यांना नियमांच्या चौकटीत घेरण्यासाठी ते सक्षम आहेत. अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: