Pune Rajaram Bridge | राजाराम पुलाची दुरुस्ती सुरू | वाहतुक कधी राहणार बंद! जाणून घ्या
Rajaram Bridge Sinhgadh Road – (The Karbhari News Service) – सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाची आजपासून दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या पुलाची एक लेन वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. हे काम १७ जानेवारी पर्यंत सुरू असणार आहे. अशी माहिती महापालिका प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिली. (PMC Project Department)
राजाराम पुलाची २६ डिसेंबर पासून ते १७ जानेवारी पर्यंत दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. पुलाच्या Expansion Joints चे दुरुस्ती चे काम केले जाणार आहे. त्यामुळे पुलावरील एक लेन वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दरम्यान हे काम रात्री ११ वाजलेपासून ते पहाटे ५ पर्यंत काम चालणार आहे. एक लेन बंद असली तरी दुसरी लेन ही सुरू राहणार आहे. हे काम फक्त रात्री होणार आहे. दिवसा या दोन्ही लेन सुरू असणार आहेत. त्यामुळे दिवसा वाहतुकीची समस्या नसणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS