PMC Divyang Upchar Kendra | दिव्यांग बालकांसाठी वरदान ठरते आहे पुणे महापालिकेचे दिव्यांग उपचार केंद्र!
PMC UMANG – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने बालेवाडी परिसरात दिव्यांग उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. हे केंद्र दिव्यांग बालकांसाठी वरदान ठरताना दिसून येत आहे. दिव्यांग बालक आणि त्यांचे पालक यांना या केंद्रामुळे चांगला दिलासा मिळाला आहे. कारण बालकांमध्ये सुधारणा दिसून येत आहेच शिवाय खाजगी केंद्र पेक्षा हे केंद्र किफायतशीर असल्याने नागरिकांना दुहेरी फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. (PMC Social Devlopment Department)
समाज विकास विभागाच्य माहितीनुसार पुणे महानगरपालिका स्मार्ट सिटी प्रकल्पा अंर्तगत बालेवाडी येथील अंदाजे १५५० चौ.मी क्षेत्रफळ जागा दिव्यांग पार्क म्हणून विकसित करणेत आली होती. ही जागा पुणे महानगरपालिका समाज विकास विभागास हस्तांतरीत केल्यानंतर या ठिकाणी दिव्यांग उपचार केंद्र सुरू करणेसाठी उपयोगात आणण्यात येत आहे. दिव्यांग पार्क, हि मिळकत संयुक्त प्रकल्पासाठी ५ वर्षे कालावधीसाठी म्हणजेच २०३० पर्यंत दिव्यांगांसाठीच्या केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या थेरपी उपचार, समुपदेशन थेरपी सेंटर चालविणेकरीता उमंग इन्स्टीटयुट ऑफ ऑटिझम अॅन्ड मल्टीडबीलीटी रिसर्च सेंटर (सिद्धीविनायक प्रतिष्ठाण संचलित), लातुर या संस्थेस देण्यात आली आहे.
हे उपरोक्त दिव्यांग उपचार केंद्र १५ जून पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. संयुक्त प्रकल्पानुसार दिव्यांग उपचार केंद्रात खालील १३ प्रकारचे उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दिव्यांग उपचार केंद्रात पुणे मनपाच्या अधिनस्त रूग्णालये, दवाखाने व पुणे मनपाच्या शाळा यांच्याकडून नवजात, इतर दिव्यांग बालके यांना पुढील उपचारासाठी पाठविणेत येत आहे. पुणे मनपाच्या रूग्णालये व शाळांकडून पाठविलेले दिव्यांग बालके व रूग्ण यांना प्रस्तावित दरापेक्षा निम्या दराने (५०%) शुल्क आकारणी करून व उर्वरित (५०%) शुल्क पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग यांचेकडून संस्थेला दिली जात आहे. त्यानुसार या केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग बालकांवर खालील प्रमाणे अल्प दरात उपचार करण्यात येत आहेत.
1. PEDIATRIC NEUROLOGICAL CONSULTATION – Rs. 200/-
2. PSYCHOLOGICAL EVALUATIONS – Rs.300/-
3. SPEECH THERAPY – Rs.300/-
4. OCCUPATIONAL THERAPY – Rs.350/-
5 PHYSIOTHERAPY – Rs.200/-
6. BEHAVIOUR MODIFICATION THERAPY – Rs.300/-
7. GENETIC CONSULTATIONS – Rs.350/-
8. OAE (AUDIOLOGAL TEST) – Rs.250/-
9. PTA TEST- Rs.250/-
10. SPCIAL EDUCATION – Rs.300/-
11. REMEDIAL THERAPY- Rs.500/-
12. BERA TEST- Rs.1200/-
13. EEG TEST – Rs.1000/-
दिव्यांग उपचार केंद्र (उमंग) याबाबतची माहिती प्रभाग पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध बचत गटांच्या बैठका, दिव्यांग नागरिक व जेष्ठ नागरिक बैठका, प्रभागातील महिला सक्षमीकरण केंद्र, दिव्यांग पुनर्वसन विषयक काम करणाऱ्या संस्था-संघटना, प्रसुतिगृहे, रूग्णालये, अंगणवाडी, बालवाडी, शाळा इत्यादींना भेटी देणेत येवून दिव्यांग उपचार केंद्र विषयक माहितीचा प्रचार-प्रसार करणेत येत आहे. असे समाज विकास विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

COMMENTS