PMC Employees Income Tax | आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक करण्याचे महापालिका कर्मचाऱ्यांना आवाहन! 

Homeadministrative

PMC Employees Income Tax | आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक करण्याचे महापालिका कर्मचाऱ्यांना आवाहन! 

Ganesh Kumar Mule Jul 22, 2025 8:54 PM

Pan-Aadhaar Link: 31 मार्चपूर्वी पॅन-आधार कार्ड जोडणे आवश्यक | हे घरबसल्या ऑनलाइन करा
PAN – Aadhaar Link | तुमचे PAN Aadhaar शी लिंक झाले आहे कि नाही? | 10 हजार रुपये दंड होऊ शकतो
PMC Pune City AIDS Control Society | तुम्हांला Income Tax मधून सूट मिळवायचीय? तर मग पुणे महापालिकेच्या या संस्थेला डोनेशन द्या! | महापालिकेला मिळाले प्रमाणपत्र 

PMC Employees Income Tax | आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक करण्याचे महापालिका कर्मचाऱ्यांना आवाहन!

 

PMC Employees – (The Karbhari News Service) – आधार-पॅन लिंक (PAN Aadhaar Link) करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) एक मुदत ठरवून दिली होती. मात्र या कालावधीत हे काम न केल्याने आणि मुदतीत आयकर (Income tax) न भरल्याचा आर्थिक फटका पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) बसला होता. कारण आयकर विभागाकडून दंडाच्या नोटीसा आल्या होत्या. मात्र याला संबंधित विभाग आणि बिल क्लार्क जबाबदार असल्याचे मानले जात होते.  आगामी काळात असे होऊ नये आणि आपल्या विभागावर काही येऊ नये म्हणून  मुख्य व लेखा अधिकारी यांनी एक परिपत्रक जारी करत आधार आणि PAN लिंक करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले आहे. ही मुदत ३० सप्टेंबर पर्यंत असणार आहे.  (Pune Municipal Corporation – PMC)

– चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे

आधार पॅन लिंक न करणे आणि आयकर न भरण्याची चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. कारण काही वेळेस कर्मचाऱ्यांना माहिती मिळत नाही तर काही वेळेस कर्मचारी टाळाटाळ करतात. यामुळे आयकर भरणे राहून जाते. तसेच आधार पॅन लिंक न करण्याची जास्त संख्या देखील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची आहे. वस्तुतः सरकारचे असे काही नियम आल्यास कर्मचाऱ्यां पर्यंत पोचवणे ही जबाबदारी महापालिकेची आहे. यात प्रमुख भूमिका ही संबंधित खाते आणि बिल क्लार्क ची असते. मात्र हे लोक याबाबत उदासीन असतात. त्यामुळे कर्मचारी या सगळ्या बाबत अनभिज्ञ राहतात. परिणामी सरकारच्या नियमांची पायमल्ली केली जाते. याच कारणास्तव  आयकरच्या कक्षेत असताना देखील आयकर न भरल्याने आयकर विभागाकडून दंडाची कारवाई सुरू करण्यात आली होती.

काय आहे परिपत्रक!

पुणे महानगरपालिकेकडील विविध खात्याच्या रजिस्टर TAN विरुद्ध थकीत TDS दायित्वाबाबत आयकर खात्याकडून प्राप्त नियम व सूचना यांचे सर्व DDO / खातेप्रमुख यांनी कार्यवाही करणेबाबत वेळोवेळी कळविण्यात आले आहे. विविध खात्यांकडे 24Q ची TDS डिमांड नोटीस असल्याचे तोंडी समजल्याने, सदर डिमांड नोटीसचे संबंधित खात्याकडील DDO / खातेप्रमुख, संबंधित बिल क्लार्क / जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांनी माहे ३१ मार्च २०२५ पर्यंत आपले स्तरावर निवारण करून घ्यावे असे यापूर्वी कळविण्यात आले होते.

तथापि, Government of India, Ministry of Finance, Department of Revenue, Central Board of Direct Taxes, New Delhi यांनी संदर्भ क्र. ४ अन्वये परिपत्रक प्रसृत केले आहे. सदर परिपत्रकाचे अवलोकन करून, संबंधित खात्याकडील DDO / खातेप्रमुख यांनी त्यांचे नियंत्रणाखालील अधिकारी / कर्मचारी यांना अवगत करावे व प्रकरणी आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक करणेबाबत विहित मुदतीत पूर्तता करण्यात यावी. ही मुदत ३० सप्टेंबर पर्यंत असणार आहे. तरी, प्रकरणी पूर्तता करणेस विलंब होऊन महानगरपालिकेस आर्थिक तोषीस लागल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित खात्याची राहील याची नोंद घ्यावी. असे म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: